cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Regional > रत्नागिरीतील गोपाळगडावर सोमवारी फडकणार भगवा ध्वज
Regional

रत्नागिरीतील गोपाळगडावर सोमवारी फडकणार भगवा ध्वज

CliQ INDIA
Last updated: February 19, 2024 11:52 am
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

रत्नागिरी, 18 फेब्रुवारी : शिवजयंतीनिमित्ताने अंजनवेल (ता. गुहागर) येथील गोपाळगड किल्ल्यावर सोमवारी (दि. १९ फेब्रुवारी) भगवा ध्वज फडकविण्यात येणार आहे.

गोपाळगड किल्ला विजापूरच्या आदिलशहाने सोळाव्या शतकात बांधला. शिवरायांनी १६६० मध्ये तो जिंकला. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मोगल आक्रमणात सिद्दी खैरातखानने तो १६९९ मध्ये जिंकला. त्यानंतर १७४४ मध्ये तुळाजी आंग्रेने तो जिंकेपर्यंत तो सिद्दीच्याच ताब्यात राहिला. या काळात सिद्दीने किल्ल्याचा विस्तार करून त्यात सुधारणा केल्या. नंतर तुळाजी आंग्रेनेही त्याचा विस्तार केला. त्यानंतर १८१८ साली कर्नल केनडी याने किल्ल्याचा ताबा घेतला आणि नंतर स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत तो ब्रिटिशांच्या ताब्यात होता. तुळाजी आंग्रे कृष्णभक्त होते. त्यांनी जेव्हा हा किल्ला ताब्यात घेतला, तेव्हा याचे नाव गोपाळगड करण्यात आले. या किल्ल्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शिवतेज फाउंडेशन आणि गुहागरवासीयांनी पुढाकार घेतला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांचा ठेवा जतन करणाऱ्या शिवतेज फाउंडेशन आणि गुहागरच्या नागरिकांतर्फे शिवजयंतीनिमित्ताने शिवपादुकांची रथयात्रा काढण्यात येणार आहे. सकाळी ९ वाजता शृंगारतळीतून, तर १० वाजता गुहागर येथून शिवरथ यात्रा काढण्यात येणार आहे. गुहागर बसस्थानकावर मळण येथील शिवकालीन साहसी खेळांच्या कसरती सादर केल्या जाणार आहेत. कीर्तनवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर मंडळाकडून वारकरी परंपरेनुसार रिंगण घातले जाणार आहे. हेदवीतील विद्यार्थ्यांचे झांज पथक आणि दुचाकी फेरी मिरवणुकीची शोभा वाढवणार आहेत. बाजारपेठ मार्गे श्री देव व्याडेश्वर मंदिर, ग्रामदेवता श्री व्याघ्रांबरी मंदिरात रथ भेटीला जाईल. तेथून ११.३० वाजता वरचापाट येथील श्री दुर्गादेवी मंदिरात आगमन होईल. तेथे शिवरायांच्या पुतळ्याचे ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषात पूजन आणि जगदंबेची भेट होईल. यावेळी गुहागर बाजारपेठ व वरचापाट, मोहल्ला, बाग याठिकाणी पादुकांचे पूजन केले जाणार आहे.

देवस्थानातर्फे प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. तेथून शिवरथ यात्रा वरचापाट बाग, रानवी मार्गे अंजनवेलमध्ये दाखल होणार आहे. याच वेळी शृंगारतळी येथून निघालेली शिवरथ यात्रा पालपेणे, साखरीबुद्रुक, रानवी मार्गे अंजनवेल येथे पोहोचेल. त्यानंतर एकच शिवरथ यात्रा अंजनवेल येथील गोपाळगड किल्ल्यावर जाईल. तेथे भगवा ध्वज फडकविल्यानंतर रथयात्रा समाप्त होणार आहे.

 

You Might Also Like

हुंड्यासाठी छळ, सुनेनं गळफास घेतला | BulletsIn
सोलापूर : पूर्व भागात रंगणार तेलुगु भाषिकांचा ब्रतुकम्म
मुंबई : दारुड्यामुळे बस अपघात, तरुणीचा मृत्यू; ९ जखमी, तिघांची प्रकृती चिंताजनक | BulletsIn
भारत – व्हिएतनाम व्यापार संधी; निमात मोफत चर्चासत्र व भेट | BulletsIn
चिमुकल्या मुलांचा मृतदेह खांद्यावर घेऊन आई-वडिलांची १५ किमी पायपीट | BulletsIn

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article शिवजयंती उत्सव साजरा करतानाच जनतेच्या मनामनात शिवकार्याची प्रेरणा निर्माण करुया – अजित पवार
Next Article पॅराग्लायडींग साहसी खेळाची जागतिक स्पर्धा घेणार – मुख्यमंत्री
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?