पुणे, 13 जानेवारी (हिं.स.) 22 जानेवारीला राममंदिर होत आहे. सध्या या सोहळ्याने देशभरात आनंदाचे वातावरण आहे. यानिमित्त महाराष्ट्रभर महाआरत्या करा, आनंद साजरा करा, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. ते आज पुण्यात सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या राज्यस्तरीय मेळाव्यात बोलत होते.
ते पुढे म्हणाले, बाकी भानगडीत पडू नका. इतकेच सांगेन की कार सेवकांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण होत आहे. तेव्हा मनसेच्या सैनिकांनी कार सेवकांच्या आनंदात सहभागी व्हायचे आहे. जिथे जिथे शक्य आहेत तिथे आरत्या किंवा विविध स्वरूपाचे कार्यक्रम इतरांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने साजरे करा.
हिंदुस्थान समाचार
