मोदींनी दलित कुटुंबाच्या घरी जाऊन घेतला चहा
अयोध्या, 30 डिसेंबर (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील अयोध्येतील महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धामचे उद्घाटन केले. विमानतळाचा पहिला टप्पा 1450 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आला आहे. विमानतळ टर्मिनल इमारतीचे क्षेत्रफळ 6500 चौरस मीटर आहे, जे दरवर्षी सुमारे 10 लाख प्रवाशांना सेवा देण्यासाठी सुसज्ज असेल.
रामनगरी अयोध्येच्या इतिहासात आज, शनिवारी अनेक नवे अध्याय जोडले गेले. अयोध्येत रेल्वे स्थानकाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधानांनी अमृत भारत आणि वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर पतंप्रधानांनी महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे देखील लोकार्पण केले. या विमानतळाच्या उभारणीसाठी आतापर्यंत 1463 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. विमानतळाच्या उभारणीचे काम सुमारे 2 वर्षांपूर्वी सुरू झाले. त्यासाठी 821 एकर जमीन घेण्यात आली. यापूर्वी एटीआर-72 विमानांच्या उड्डाणासाठी विमानतळ तयार करण्याचे उद्दिष्ट होते. परंतु, नंतर ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ म्हणून घोषित करण्यात आले. आता विमानतळ एटीआर-72 आणि एअरबस फ्लाइटसाठी सज्ज आहे. सुमार 2250 मीटर लांब आणि 45 मीटर रुंद धावपट्टी रामायणावर आधारित चित्रांनी सजलेली टर्मिनल इमारत बांधली आहे. आता दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू करण्याची तयारी सुरू आहे.
दरम्यान आपल्या व्यस्त कार्यक्रमात प्रोटोकॉल तोडून पंतप्रधान नरेद्र मोदींनी दलित वस्तीला भेट दिली. यावेळी त्यांनी एका कुटुंबासोबत चहापानही केले. अयोध्या जंक्शनवरून उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी रस्त्याने अयोध्येतील राजघाट परिसरातील धनीराम मांझी या दलित कुटुंबाच्या घरी पोहोचले. पंतप्रधान मोदींनी कुटुंबातील गृहिणी मीरा यांच्या हातचा चहा घेतला. तसेच राम मंदिराच्या फोटोवर ऑटोग्राफ दिला. नावाच्या वर वंदे मातरम लिहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कंधारपूर परिसरात असलेल्या धनीराम माझी यांच्या घरी पोहोचून त्यांची भेट घेतली. मोदींनी त्यांना प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलेय.
हिंदुस्थान समाचार
