नाशिक, २३ डिसेंबर (हिं.स.) : नाशिकचे अल्हाददायक वातावरण, निसर्गरम्य वातावरण, येथील संस्कृती हे सगळं मनाला आनंद देणारे आहे. नरेडकोच्यावतीने आयोजित होमेथॉन प्रदर्शनामध्ये विविध स्टॉलला भेट दिल्यानंतर नाशिक किती बदलतय याची प्रचिती आली. हे सर्व प्रकल्प बघितल्यानंतर नाशिकमध्ये घर घ्यायला आवडेल अशी भावना प्रसिध्द अभिनेत्री प्रार्थना बेेहरे यांनी व्यक्त केली.
सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नरेडको) तर्फे दि.२१ ते २५ डिसेंबरपर्यंत सकाळी १० ते रात्री ८ असे चार दिवसांचे ‘होमेथॉन प्रदर्शन ‘ नाशिक शहरातील गंगापूररोडवरील डोंगरे वसतिगृह मैदान येथे सुरू असून यानिमित्त दि.२३ रोजी सांयकाळच्या सत्रात प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी निर्मिती अॅडव्हर्टायझिंगचे संचालक नंदन दीक्षित व निवेदिका किशोरी किणीकर या दोन्ही मुलाखतकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना प्रार्थना यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली.
याप्रसंगी व्यासपीठावर नरडेको नाशिकचे अध्यक्ष अभय तातेड व वंदना तातेड, होमेथॉनचे समन्वयक जयेश ठक्कर व जयश्री ठक्कर, सचिव सुनील गवादे व गीता गवादे, होमेथॉनचे सहसमन्वयक शंतनु देशपांडे व आसावरी देशपांडे,पुरूषोत्तम देशपांडे व सौ.शाल्मली देशपांडे, भूषण महाजन व मृणाल महाजन, श्री व सौ अविनाश शिरोडे, टायटल स्पॉन्सरर दीपक चंदे व दीपा चंदे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अभिनेत्री प्रार्थना म्हणाल्या की, नरेडकोने होमेथॉनच्या माध्यमातून १५ लाख ते अगदी १२ कोटी रूपयांपर्यंतची घरे उपलब्ध करून दिली आहेत. खरं म्हणजे सगळयांसाठी घर ही संकल्पना घेऊन नरेडकोने आयोजित केलेले हे प्रदर्शन बघून खुप आनंद वाटला. ज्यावेळी मी या प्रदर्शनातील विविध स्टॉल्सला भेटी दिल्या तेव्हा आपण खरचं नाशिकमध्ये आहोत का यावर विश्वासच बसला नाही. नाशिकचा हा विकास पाहून नाशिक पुढील पाच वर्षात मुंबई, पुण्यालाही मागे टाकेल यात शंका नाही. नाशिकचे आणखी एक वैशिष्टै म्हणजे आजही या शहराने संस्कृती, परंपरांची त्यातच इथले हवा, पाणी आणि एकूणच वातावरण अत्यंत प्रसन्न, छान आणि सुंदर आहे. तसेच येथील निसर्गाचे वातावरण अत्यंत अल्हाददायक असल्याने ऑक्सिजन देखील चांगला मिळतो. त्यामुळे मला देखील नाशिकमध्ये घर घेऊन येथे राहायला आवडेल.’
हिंदुस्थान समाचार
