मुंबई, 12 जुलै (हिं.स.) – महाराष्ट्राच्या अस्मितेचे, स्वराज्याच्या गर्जनेचे आणि आपल्या गौरवशाली इतिहासाचे साक्षीदार छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले, ह्याचा आम्हाला अभिमान वाटतो. हे गड-किल्ले म्हणजे शौर्य, सामर्थ्य, संस्कृतीचे आणि स्वराज्याच्या दृढ इच्छाशक्तीचे मूर्तिमंत रूप. मराठ्यांच्या दैदिप्यमान इतिहास ह्यानिमित्ताने संपूर्ण जगासमोर उलगडला जाईल, असा विश्वास शिवसेना (उबाठा) आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. आता हा वारसा अतिशय काळजीपूर्वक जपण्याची आणि त्याचे संरक्षण करण्याची राज्य सरकारची जबाबदारी वाढली आहे. ह्यासाठी सरकारने ठोस पावले उचलायला हवीत. आम्ही अशा प्रत्येक पावलावर सरकारला साथ देऊ, असेही त्यांनी म्हटले आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी
