अमरावती, 23 ऑक्टोबर (हिं.स.) : स्थानिक पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना आणि पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप अमरावती तर्फे संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्य भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. अमरावती जिल्ह्यातील थ्यालिसीमिया व सिकलसेल या आजारामुळे वाढलेला रक्ताचा तुटवडा कमी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न संस्थेच्या वतीने यावेळी करण्यात आला. डॉ पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय तसेच अमरावती व जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती रुग्णालयातील वैद्यकीयनि यावेळी रक्ताचे संकलन केले या दोन्ही रुग्णालयातील चमूचे महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करण्यात आले.
या शिबिरा निमित्य अमरावती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. वाडेगावकर यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापकांनीसुद्धा रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करून सहभाग नोंदविला तसचे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. या शिबिराच्या यशस्वी आयोजनाकरिता राष्ट्रीय सेवा योजना व सर्व महाविद्यालयातील प्राचार्य, विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
हिंदुस्थान समाचार
