परळी वैद्यनाथ, २४ ऑक्टोबर, (हिं. स) – राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील तमाम जनतेसह महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना विजयादशमी तथा दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या विजयादशमीच्या निमित्ताने सर्वांच्या आयुष्यात आनंद व भरभराटी येवो, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी सर्वांना दसऱ्याच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या आहेत.
असत्यावर सत्याचा विजय म्हणून विजयादशमीच्या सणाला आपल्या संस्कृतीत अत्यंत महत्व आहे. कुठल्याही शुभकार्याची सुरुवात करण्यासाठी हा अत्यंत उपयुक्त मुहूर्त समजला जातो.
नैसर्गिक संकटांचे सीमोल्लंघन साधून माझ्या शेतकरी – बळीराजाच्या आयुष्यात समृद्धी येऊ दे, असे साकडे यानिमित्ताने धनंजय मुंडे यांनी मुंडे कुटुंबाचे कुलदैवत माहूर वासिनी आई रेणुका मातेकडे घातले आहे.
हिंदुस्थान समाचार
