cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Entertainment > अमृता पवार साकारणार ‘पद्मिनी’ – Hindusthan Samachar Marathi
Entertainment

अमृता पवार साकारणार ‘पद्मिनी’ – Hindusthan Samachar Marathi

CliQ INDIA
Last updated: October 24, 2023 3:30 am
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE

मुंबई, 23 ऑक्टोबर (हिं.स.) : नाटक हा अनेक कलाकारांचा जिव्हाळ्याचा विषय. मालिका सिनेमा करत असताना सुद्धा अनेक कलाकार प्रायोगिक असो वा व्यावसायिक रंगभूमीवर आपल्या अभिनयाची परीक्षा घेतच असतात. आता पुन्हा एकदा एक अभिनेत्री व्यावसायिक रंगभूमीवर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना एक गूढ अनुभव देण्यासाठी सज्ज होत असून ही अभिनेत्री म्हणजे ‘अमृता पवार’. शाळेपासून अभिनयाची कास धरून आपल्या हळूहळू प्रेक्षकांच्या मनात जागा करणारी अमृता पवार ‘२१७ पद्मिनी धाम’ या नाटकातून व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करणार आहे.

शाळा ते कॉलेज आणि मग मालिका असा अभिप्रेत अभिनयाचा प्रवास करणारी अभिनेत्री अमृता ही पहिल्यांदा कॆमेरासमोर आली ती म्हणजे दुहेरी या मालिकेतून, तिथून तिचा सुरु झालेला प्रवास हा आज पर्यंत कधी थांबला नाही. ‘ललित २०५’ या मालिकेतील तिने साकारलेली ‘भैरवी’ प्रेक्षकांना चांगलीच भावली. या नंतर ती स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेत जिजाऊ स्वीकारताना दिसली. जिजामाताची आव्हानात्मक भूमिका साकारण्यासाठी अमृताने शिवकालीन युद्ध कलेचे आणि घोडेस्वारीचे चोख प्रशिक्षण घेतलं होत. या ऐतिहासिक भूमिके नंतर अमृता जिगरबाज या मालिकेत दिसली. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेत सुद्धा ती प्रमुख भूमिकेत होती. ‘आशीर्वाद तुझा एकवीरा आई’ या मालिकेने छोट्या पडद्यावरून एक्झीट घेतली असली तरी या मालिकेतील अमृता ने साकारलेली ‘ तानिया ‘ अनेकांच्या लक्षात आहे. मालिका विश्वात आपल्या अभिनयाने अमृताने मिळवलेल्या प्रेक्षक वर्गाला ती आता नाट्यगृहाकडे येण्यासाठी खुणावत आहे. करण भोगले निर्मित रत्नाकर मतकरी यांच्या कामगिरी कथेवर आधारित आणि संकेत पाटील दिग्दर्शित ‘२१७ पद्मिनी धाम’ या नाटकात ती पद्मिनी ची भूमिका साकारत आहे. हे पात्र या नाटकाचं मध्यवर्ती पात्र आहे. या नाटकाच कथानक ‘पद्मिनी’ मुळे घडत असत. पद्मिनी साकारणारी अमृता हीच हे पहिलं वहिलं व्यावसायिक नाटक असल तरी रंगभूमीवर काम करण्याचा अनुभव तिला आहे. रावराजेची एकुलती एक मुलगी पद्मिनी आणि मुरंजन अशा त्रिकुट भोवती या नाटकाची कथा घडत असते. पद्मिनी साकारण्यासाठी सज्ज असलेली अमृता सध्या जोमाने तालीम करत आहे. लवकरच रंगभूमीवर येणार हे ‘२१७ पद्मिनी धाम’ या नाटकाच संगीत शुभेम ढेकळे करत असून नेपथ्य संदेश बेंद्रे करत आहेत. तर नाटकांची प्रकाशयोजना शीतल तळपदे यांची असून नाटकाची सूत्र कल्पेश बाविस्कर आणि नितीन नाईक सांभाळत आहे.

२०१६ पासून मालिका आणि मनोरंजनसृष्टीत काम करतेय. पण नाटक करण्याची संधी कधी मिळाली नाही. स्वतःच्या अभिनयाची प्रगल्भता ही नाटकानेच समजून येते. आता नाटक करावं म्हणून नाटक शोधत असतानाच २१७ पद्मिनी धाम साठी विचारणा झाली. रत्नाकर मतकरीच्या कथेवरील या नाटकांच वाचन जेव्हा माझ्यासोबत करण्यात आलं त्याच्या दुसऱ्याच क्षणी मी करतेय असं मी जाहीर केलं. या नाटकाचा दिग्दर्शक संकेत पाटील नवीन आहे तो संगीत दिग्दर्शक म्हणून अनेकांना माहिती असला तरी त्याची दिग्दर्शकाची बाजू किती दृढ आहे याचा मला प्रत्यय या नाटकाच्या निमित्ताने येतोय. एकांकिका करून मोठं होत असताना एकत्र येऊन एक मोठी कलाकृती उभं करण्यासाठीची धडपड जी माझ्यात होती ती मला या माझ्या या नाटकाच्या टीम मध्ये जाणवते. नाटकाचा शुभारंभ लवकरच होईल, आणि प्रेक्षकांना गूढ मनोरंजनाचा अनुभव आम्ही देऊ हे नक्कीच.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

रश्मिका मंदानाने व्हायरल ऑडिओ क्लिपवर २४ तासांचा कायदेशीर इशारा दिला
अस्तिकाला नागरूपात आणण्यासाठी एक अनोखे महानाट्य घडणार
'महापरिनिर्वाण'चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला
राष्ट्रग्रंथ : एक अनोखा नाट्यमय अनुभव | BulletsIn
निशीच्या लग्नाला उमा आणि ओवीचा शृंगार

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article बंगालच्या उपसागरात निर्माण झाले हमून चक्रीवादळ
Next Article पी. आर. पोटे पाटील महाविद्यालयात ३०४ रक्तदात्यांनी केले रक्तदान
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?