नाशिक, 19 ऑगस्ट (हिं.स.)। जिल्ह्यातील ११ नगर परिषदांची प्रारूप प्रभागरचना प्रसिद्ध करण्यात आली. यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याच्या मार्गावर आहे. नगर परिषदांच्या प्रभाग रचनेच्या वेळापत्रकानुसार प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव नगरविकास निवडणूक विभागाकडून आयोगाकडे सादर झाला होता. आयोगाने प्राधिकृत केलेल्या – अधिकाऱ्याने प्रारूप प्रभाग रचनेला – मान्यता दिल्यानंतर सोमवारी जिल्ह्यातील ११ नगर परिषदांच्या – प्रारूप प्रभाग रचना संबंधित नगर परिषद कार्यालयात प्रसिद्ध करण्यात – आली. त्यावर हरकती व सूचना मागविण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
नाशिक जिल्ह्यात एकूण ११ नगर परिषदांच्या निवडणूक कार्यक्रम – जाहीर झाला आहे. मनमाड नगर परिषदेत (३३), येवला (२६), सिन्नर (३०), ओझर (२७), येवला (२६), पिंपळगाव बसवंत (२५), चांदवड (२०), इगतपुरी (२१), सटाणा (२४), भगूर (२०), त्र्यंबकेश्वर (२०) आणि नांदगाव नगर परिषदेत (२०) जागांसाठी निवडणूक होणार आहे. यातील ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत.
—————
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV
