छत्रपती संभाजीनग, 20 जानेवारी (हिं.स.) : छत्रपती संभाजीनगर महापालिकेने तब्बल १०० कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसुल केलाय. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वीच महापालिकेने १०० कोटींचा आकडा गाठला आहे.
महापालिकेकडून आतापर्यंत १०० कोटी १ लाख १३ हजार ५३६ रूपये इतका मालमत्ता कर वसुल करण्यात आला आहे. शहरातील १० हजार मालमत्ताधारकांकडे ४२५ कोटी रूपयांचा मालमत्ता कर बाकी आहे . यापैकी ९४ मालमत्ता धारकांच्या विरूध्द महाराष्ट्र अधिनियमनुसार जप्ती , लिलावाची कारवाई साठी महानगरपालिकेने ठोस पावल उचलायला सुरूवात केली आहे . मालमत्ता व पाणीपट्टी करांतून ३०० कोटी रूपयांची वसुली मार्च २०२४ अखेरीस करण्यासाठी महानगरपालिकेचे कर्मचारी प्रयत्न करत आहे
हिंदुस्थान समाचार
