नाशिक, ०२ डिसेंबर, (हिं.स.) – मराठा समाजासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे हे सरकारला धोकादायक वाटत असल्याने आता मनोज जरांगे यांना ही कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, असा दावा करून ठाकरे गटाचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी सांगितले की, राज्यामध्ये आता भाजपाने चरित्र हनन करण्याचा कुटील डाव सुरू केला आहे आणि तेच आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलत असल्याचा दावा केला आहे.
ठाकरे गटाचे खासदार आणि नेते संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावरती आले होते. नाशिकमध्ये आल्यानंतर खासदार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांचे स्वागत महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, उपनेते सुनील बागुल, बबनराव घोलप, नाशिक रोड व्यापारी बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड, नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष माजी आमदार वसंत गीते, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, देवानंद बिरारी, राजू वाकसरे ,सुनील गोडसे,
त्यानंतर मालेगावमध्ये नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केलेल्या न्यायालयीन दाव्या संदर्भामध्ये न्यायालयात हजर राहण्यासाठी म्हणून संजय राऊत ते नाशिकमध्ये आले होते. त्यावेळी हे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, मी कोणाविरुद्ध काहीही बोललेलं नाही मी फक्त त्या कारखान्यांमध्ये शेतकऱ्यांनी गुंतवलेले पैसे कुठे गेले शेतकरी तो जाब विचारू शकत नाही त्यांना तो अधिकार नाही. त्यामुळे मी साधा प्रश्न विचारला. त्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी प्रश्न विचारला तर अब्रू कशी गेली असा प्रश्न उपस्थित करून संजय राऊत म्हणाले की, मालेगावात आम्ही कोर्टात जाऊ कोर्टामध्ये भूमिका मांडू असे स्पष्ट सांगून ते म्हणाले की, दादा भुसे हे सत्तेचा गैरवापर करत आहे. त्यांच्यासह सध्या राज्यामध्ये असलेले सर्व मंत्री हे भ्रष्ट आहेत. या सरकारचा पाया आणि कळस हा दोन्हीही भ्रष्ट मार्गाने उभा राहिलेला आहे. खोके मोजून हे सरकार तयार झाले आहेत, असा आरोप पुन्हा एकदा करत राऊत म्हणाले की, माझ्याकडे सर्व कागदपत्र आहेत. या कागदपत्रांना मी कोर्टामध्ये सादर करेल. आम्ही न्यायालयाचा आदर करतो म्हणून मी न्यायालयात आज हजर राहत आहे.
अजित पवार यांच्या झालेल्या मेळाव्या संदर्भामध्ये बोलताना संजय राऊत म्हणाले की, सध्या राज्यामध्ये भाजप हे चरित्र म्हणून करीत आहे म्हणूनच शिंदे आणि अजित पवार हे दोघेही भाजपाने लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचत आहे. या योजनेअंतर्गत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना चरित्र हनन करून बदनाम करण्याचे कुटिल कारस्थान देखील सुरू आहे. खोटे आरोप अलकाता टेरर हे काम करत होती आता तेच काम भाजपा करत आहे. भाजपाने पक्ष फोडले घर फोडले. आता नेते तुटत नाहीत म्हणून त्यांच्यावर चारित्र्यावरती हल्ला केला जात आहे, असे सांगून राऊत पुढे म्हणाले की अजितदादा आणि मुंडे गटाने त्यांचा मार्ग निवडला आहे त्यांनी तसेच जावे आता अजित दादा बोलत नाही तर भाजप त्यांच्या तोंडून बोलून चरित्र हनुमान करत आहे.
हिंदुस्थान समाचार
