नाशिक, ०६ ऑक्टोबर (हिं.स.) : महाराष्ट्र शासनाने ताबडतोब नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या रुग्णालयामध्ये औषधांचा तुटवडा आहे सोयींचा तुटवडा आहे रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. आणि दयनीय अवस्था रुग्णालयाची झालेली आहे शासनाने त्वरित पाऊल न उचलल्यास काँग्रेस पक्षातर्फे मोठ्या आंदोलन उभे केले जाईल असे मत नाशिक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाजेड यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रातील विविध शासकीय रुग्णालयामध्ये होणाऱ्या मृत्यूच्या त्यांच्या पार्श्वभूमीवर आज नाशिक शहर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने नाशिक जिल्हा रुग्णालयास भेट दिली यावेळेस अनेक रुग्णांनी त्यांच्या तक्रारींचा पाढा काँग्रेस शिष्टमंडळ समोर वाचला. शहराध्यक्ष आकाश यांच्या नेतृत्वाखाली इष्टमंडळ आणि संबंधित अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून शासनाला त्वरित औषध व उपकरणांची पूर्तता करावी व रुग्णांचे अतोनात होणारे हाल थांबवावे ही मागणी केली. यावेळेस माजी सभागृहा नेते राजेंद्र बागुल डॉक्टर सुभाष देवरे उल्हास सातभाई हनीफ बशीर सुरेश मारू स्वप्निल पाटील अल्तमस शेख बबलू खैरे स्वाती जाधव विजय पाटील उद्धव पवार कैलास कडलग संतोष ठाकूर राजकुमार जेफ हलीम शेख अण्णा मोरे ज्ञानेश्वर चव्हाण इसा कुरेशी आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार
