सिंधुदुर्ग, 15 नोव्हेंबर (हिं.स.) : केंद्र सरकारची ‘विकसित भारत संकल्प यांत्रा’ ही देशव्यापी मोहिम १५ नोव्हेंबर २०२३ ते २६ जानेवारी २०२४ या कालावधीत देशभर राबविण्यात येणार आहे. या योजनेचा आढावा घेण्यासाठी भारत सरकारच्या वस्त्रोद्योग विभागाच्या सहसचिव श्रीमती प्राजक्ता लवंगारे- वर्मा यांनी मंगळवारी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकरी कार्यालयात बैठक घेतली. या आढावा बैठकीमध्ये विकसित भारत संकल्प यात्रा’ या मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी करणेबाबत श्रीमती प्राजक्ता लवंगारे- वर्मा यांनी संबधीत विभागांना सूचना दिल्या.
केंद्र सरकार ‘विकसित भारत संकल्प यांत्रा’ ही देशव्यापी मोहिम १५ नोव्हेंबर २०२३ ते २६ जानेवारी २०२४ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या संकल्प यात्रेचे उदिष्टे विविध योजनांतर्गत पात्र असलेल्या परंतू आतापर्यत लाभ न घेतलेल्या लोकांपर्यत पोहोचणे, माहितीचा प्रसार आणि योजनांबद्दल जागरूकता निर्माण करणे. संभाव्य लाभार्थी नोंदणी करणे हा आहे.
या योजनच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समिती स्थापन करणेत आलेली आहे.
या योजनेचा आढावा घेण्यासाठी श्रीम.प्राजक्ता लवंगारे- वर्मा, सह सचिव, वस्त्रोदयोग, भारत सरकार यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या आढावा बैठकीमध्ये विकसित भारत संकल्प यात्रा’ या मोहिमेच्या प्रभावीपणे अंमलबजावणी करणेबाबत श्प्राजक्ता लवंगारे- वर्मा, सह सचिव यांनी संबधीत विभागांना सूचना दिल्या. आढावा बैठक संपन्न झाल्यानंतर श्रीम.प्राजक्ता लवंगारे- वर्मा, सह सचिव यांनी सावंतवाडी नगर परिषद व ग्रामपंचायत ठिकाणांना भेटी दिल्या.
हिंदुस्थान समाचार
