नाशिक, ०६ नोव्हेंबर (हिं.स.) : नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील तोरणडोंगरी या आदिवासी पाड्यावरील उजव्या हाताने कोपरापासून दिव्यांग असून दिलीप महादू गावित या खेळाडूने आशियाई पॅरा गेम्स 2023 मध्ये पुरुषांच्या 400 मीटर T47 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल डांग सेवा मंडळ संस्थेतर्फे सत्कार समारंभ नाशिक येथे आयोजित केला होता.
देशातील युवकांमध्ये विविध प्रकारची कौशल्ये दडलेली आहेत. क्रीडा क्षेत्रासह इतर विविध क्षेत्रांमध्ये या युवकांमध्ये यशस्वी होण्याची क्षमता आहे. त्यांना योग्य दिशा दाखवताना पाठबळ देण्याची गरज आहे. पैरा आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक विजेता दिलीप गावित हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, देशभरातील क्रीडा कौशल्ये असलेले खेळाडू पुढे आणण्यासाठी सध्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने विविध प्रकल्प, योजना राबविल्या आहेत या योजनांचा खेळाडू,प्रशिक्षकांनी लाभ घ्यावा असे घेण्याचे आवाहन डॉ भारती पवार यांनी केले.
तसेच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीं नी दिलीपची कामगिरीची दखल घेत त्याचे अभिनंदन केले आहे त्याची ही कामगिरी देशभरातील तरुणांसाठी प्रेरणादायी आहेच परंतु नशिक जिल्ह्यासाठी सुध्दा अभिमानाची बाब आहे असेही डॉ भारती पवार यांनी सांगितले.दिलीपने पटकावलेल्या या सुवर्णपदकासह भारताने आशियाई पॅरा गेम्स 2023 मध्ये 100 पदके जिंकून इतिहास रचला आहे या कौतुकास्पद कामगिरीबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि उज्ज्वल भविष्यासाठी मनःपुर्वक शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी आमदार डॉ. सत्यजित तांबे,हेमलता बिडकर, मृणाल जोशी,संदीप गोलाईत,वैजनाथ काळे, कविता राऊत,फरीद शेख, शशिभाऊ जाधव, प्रशांत भदाणे, सागर वैद्य, आडके सर, दिघावकर सर, प्रभाकर पवार, शिक्षक,कर्मचारी सह आदी उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार
