सोलापूर 16 डिसेंबर ( हिं.स) मराठा समाजाला राजकारणात आरक्षण न देता शिक्षण व नोकरी बरोबर उद्योजक बनवण्यासाठी आरक्षण द्यावे अशी आग्रही मागणी आमदार समाधान आवताडे यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातील मराठा आरक्षण वरील चर्चेत मध्यरात्री बाराच्या दरम्यान केली.
मराठा आरक्षणावरून मंगळवेढ्यातील राजकीय वातावरण सत्ताधाऱ्यांवर परिणाम करणारे ठरू लागले.यामध्ये सातत्याने धरणे व ठिय्या आंदोलन,सरकारचे श्राध्द घालणे,मंगळवेढा बंद,अशी आंदोलने मराठा समाजाकडून झाल्यानंतर आता गाववाईज आंदोलन सुरू असताना आ.आवताडे आरक्षणाचा विषय विधानसभेत लावून धरला.
या चर्चेदरम्यान बोलताना आ.अवताडे म्हणाले की, मराठा समाजाला गेली 75 वर्षांमध्ये आरक्षण दिले नाही, या समाजातील काही नेत्यांनी निर्णय घेण्याच्या क्षमतेवर काम करून देखील मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी दुर्लक्ष केले.
हिंदुस्थान समाचार
