सोलापूर 29 ऑक्टोबर
टाकळी सिकंदर, ता. मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात उसाची पहिली उचल म्हणून प्रति टन 2 हजार 525 रुपये जाहीर केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.सहविज निर्मिती वगळता कुठलीही उपपदार्थ निर्मिती नसताना ऊस दराची कोंडी फोडणारा भीमा हा एकमेव कारखाना ठरला आहे, त्यामुळे आता शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
या संदर्भात माहिती देताना अध्यक्ष महाडिक म्हणाले, चालू वर्षीचा संपूर्ण पावसाळा कोरडा गेला, ऊसाला पाणी मिळाले नाही, त्यामुळे उसाची वाढ झालीच नाही. उसाच्या वजनात ही मोठी घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
