जळगाव, 16 ऑक्टोबर (हिं.स.) : एमआयडीसीतील एका प्लॉस्टीक कंपनीत कामाच्या पहिल्याच दिवशी इलेक्ट्रीक शॉक लागून तरूणाचा दुदैवी मृत्यू झाला असून दुसरा कामगार तरूण गंभीररीत्या भाजला गेल्याची घटना सोमवारी १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली आहे. जिल्हा शासकीय रूग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. . याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राहूल दरबार राठोड (वय-२२) रा. शेलगाव ता.बऱ्हाणपूर मध्यप्रदेश ह.मु. फातीमा नगर, जळगाव असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर जीवन गजानन चौधरी रा. बेदावद ता. जामनेर असे जखमी झालेल्या दुसऱ्या कामगाराचे नाव आहे.
हिंदुस्थान समाचार
