मुंबई, 14 डिसेंबर (हिं.स.) : जगातील खव्वयांना आवडीने खायला घालणाऱ्या जयंती काठाळे आणि आपल्या मसालेदार नॉनव्हेज डिशसाठी प्रसिद्ध असलेल्या नुपूर बत्तिन या दोन सुगरणींची भेट झाली. नुकताच सोशल मीडियावर त्यांनी आपला एक फोटो शेअर केला. जयंतीताई या पूर्णब्रह्मच्या व्यवस्थापकीय संचालिका असून हा मनस्विनी फुड्स प्रायव्हेट लिमिटेड यांचा प्रकल्प आहे. जगभरात मराठी खाद्य पदार्थांची गुणवत्तापूर्ण उपहारगृहे उभारणे आणि मराठी खाद्य संस्कृती दूरवर पोहचवणे हे या प्रकल्पाचे मुख्य कार्य आहे. तर नुपूर बत्तिन या अनेक चित्रपटांच्या प्रोड्यूसर आहेत. त्यांनी निर्मिती केलेले चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकले आहेत. बनीता संधू आणि दीप्ती नवाल यांच्या प्रमुख भूमिका असणारा ‘मदर तेरेसा अँड मी’ हा चित्रपट त्यांची निर्मिती आहे. तसेच त्या एक उत्तम शेफ सुद्धा आहेत. ‘नुपूर किचन’ च्या माध्यमातून, लोकांना चविष्ट, चमचमीत आणि रुचकर जेवण खाऊ घालत त्यांनी आपला स्वत:चा असा खव्वया वर्ग तयार केला आहे.
नुकताच या दोघीनी सोशल मीडियावर फोटो शेअर केल्याने खव्वयांमध्ये सुगंध पसरलाय तो यांच्यामध्ये काही तरी खास बेत शिजतोय याचा..
तुमच्यासारखेच आम्ही ही उत्सुक आहोत हे जाणून घेण्यासाठी की या दोन सुगरणी मिळून नक्की कशाचा बेत आखत आहेत!
हिंदुस्थान समाचार
