नाशिक, २५ डिसेंबर (हिं.स.) : नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्याची माहिती दिली. याप्रसंगी सुरेश शिंदे, विनायक ढोले, बी.टी. भांड, संतोष पाटील, कमलाकर बागुल, बी.एन. भालेराव, राजकुमार नरेंद्र, दिपक कटारे, कुणाल शिंदे, स्नेहल गांगुर्डे, माधुरी उगले आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार
