भंडारा १६ नोव्हेंबर (हिं. स.) : भंडारा जिल्ह्याच्या तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे यांचा पुन्हा डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे. सद्या दिवाळी निमित्त ग्रामीण भागात मंडईला (जत्रा) सुरुवात झाली आहे. प्रत्येक गावागावात मंडईला भरविली जाते. या निमित्ताने लोकांच्या मनोरंजनासाठी विवीध कार्यक्रम आयोजित केले जातात. तर कार्यक्रमाच्या उद्घाटन करण्यासाठी राजकिय नेत्याना सुध्दा आमंत्रित केले जाते. तर असाच एका कार्यक्रमात आमदार राजू कारेमोरे आले असताना. ”मला आमदार झाल्यासारखं वाटत” या गाण्यावर आमदार महोदयांनी मनसोक्त पने डान्स केला. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला वायरल झाला असून राजकिय स्थरावरून चर्चेचा उधाण आले आहे.
हिंदुस्थान समाचार
