लासलगाव, २५ डिसेंबर (हिं.स.) : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे खानगाव येथील भाजीपाला खरेदी-विक्री केंद्रात शेतकऱ्यांच्या फळे व भाजीपाला वेळोवेळी विकत घेतला जातो. मात्र शेतकऱ्यांच्या मालाची रक्कम न दिल्या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात दोन व्यापाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्ही.डी. अॅग्रोचे चालक शुभम विलास देवरे (रा खडकमाळेगाव, ता. निफाड), शिवनेरी व्हेजेटिबलचे ऋषीकेश शिवाजी आमले (रा. खडकमाळेगाव) यांचेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जवळपास ५ लाख ११ रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सन २०२१-२२ मध्ये खानगाव नजीक येथील भाजीपाला खरेदी-विक्री केंद्रात शेतकऱ्यांच्या फळे व भाजीपाला विकत घेऊन शेतकऱ्यांना त्याच्या मालाची बाकी रकम ४०३८७३ रुपये वेळोवेळी मागणी करून सुद्धा दिली नाही. शेतऱ्यांची फसवणूक केली. तसेच बाजार समितीच्या नियमाप्रमाणे होणारी बाजार की ३७१६० रुपयांची रक्कम पण दिली नाही. या प्रकरणी दोन्ही व्यापाऱ्यांवर लासलगाव बाजार समितीच्या तक्रारीनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
हिंदुस्थान समाचार
