सोलापूर, 8 सप्टेंबर (हिं.स.)उपमुख्यमंत्री अजित पवार व करमाळ्याच्या उपविभागीय पोलिस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या झालेल्या संभाषणाची क्लिप सर्वत्र व्हायरल झाली आहे. अंजना कृष्णा यांना कारवाईपासून रोखण्यात येत असल्याचे या क्लिपमध्ये दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर कृष्णा यांना सर्वसामान्य जनतेचे मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळत आहे.
कृष्णा यांच्या समर्थनार्थ करमाळा तालुक्यात जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीने करमाळ्याच्या आराध्य दैवत आई कमलाभवानी मंदिरासमोर फोटोला दुग्धाभिषेक घालण्यात आला. याशिवाय गेली तीन दिवसांपासून करमाळा तालुक्यातील अनेक लोकांच्या स्टेटसवर अंजली कृष्णा यांच्या समर्थांचे फोटो व आशय पाहायला मिळत आहे.
अंजना कृष्णा कृष्णा यांच्या समर्थनार्थ आंदोलन करताना जनशक्ती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अतुल खुपसे पाटील म्हणाले अंजना कृष्णा या एक निर्भीड, जबाबदार महिला अधिकारी आहेत. त्यांचा अपमान म्हणजे राज्यातील तमाम महिलांचा अपमान आहे. महाराष्ट्रात स्त्रियांना सन्मान दिला जातो आणि हा अपमान सहन केला जाणार नाही.” लाडक्या बहिणीचा अपमान महाराष्ट्र कधीच सहन करणार नाही.
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड
