cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांचा गोळीबारात मृत्यू
National

ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांचा गोळीबारात मृत्यू

CliQ INDIA
Last updated: February 10, 2024 12:19 pm
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE

* हल्लेखोर मॉरीस नोरोन्हा केली आत्महत्या, दोघे ताब्यात

* प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग

मुंबई, ९ फेब्रुवारी: दहिसरमधील शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गुरुवारी रात्री झालेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला आहे. मॉरीस नोरोन्हा नावाच्या व्यक्तीने त्यांच्यावर फेसबुक लाईव्ह सुरू असताना गोळ्या झाडल्या. घोसाळकरांवर गोळ्या झाडल्यानंतर मॉरिसने स्वतःवर देखील गोळ्या झाडून आत्महत्या केली. घोसाळकरांच्या हत्येप्रकरणी तथाकथित सामाजिक कार्यकर्ता मॉरिस नोरोन्हा विरोधात पोलिसांकडून कलम 302 नुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर हा गुन्हा आता गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान मेहुल पारीख आणि रोहित साहू या दोघांना ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मॉरीस नोरोन्हा नावाच्या व्यक्तीने अभिषेक यांच्यावर गुरुवारी रात्री गोळीबार केला. फेसबुक लाइव्ह सुरू असताना अभिषेक यांच्यावर एकामागून एक पाच गोळ्या झाडल्या होत्या, त्यापैकी तीन गोळ्या त्यांना लागल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. गोळ्या झाडल्यानंतर मॉरीसने देखील स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या. त्यात मॉरीसचा मृत्यू झाला. गोळीबार झाल्यानंतर अभिषेक यांना बोरीवलीच्या करूणा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र कालांतराने त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले. विशेष म्हणजे गोळीबार जेव्हा झाला, त्यावेळी मॉरिसचा पीए मेहुल पारीख देखील घटनास्थळी उपस्थित असल्याचे बोलले जात आहे, तसा उल्लेख फेसबुक लाईव्हमध्ये घोसाळकर यांची हत्या करणाऱ्या मॉरीसने केला होता. तर मुंबई पोलिसांनी घटनास्थळावरून एक पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे देखील जप्त केली आहेत. सदर पिस्टल परदेशी बनावटीची आहे. विशेष म्हणजे मॉरीसकडे पिस्तुलाचा परवाना देखील नव्हता.

खासगी वादातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी गोळीबार करणारा मॉरिसचा पीए मेहुल पारीखला रात्रीच ताब्यात घेतले आहे. त्यानंतर रोहित साहू नावाच्या आणखी एकाला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यापूर्वी नेमकं काय घडलं, हत्या करण्याचे कारण काय?, घोसाळकर आणि मॉरिसमधील कोणता वाद होता? या सर्व प्रकरणाचा पोलिसांकडून आता तपास केला जात आहे. मेहुल पारीखच्या चौकशीतून अनेक गोष्टींचा खुलासा होण्याची देखील शक्यता आहे.

याबाबत डीसीपी दत्ता नलावडे म्हणाले की, गोळीबारासाठी वापरण्यात आलेल्या शस्त्राचे स्त्रोत आणि त्याची कायदेशीर मान्यतेची खात्री करत आहोत. घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर घटनास्थळावरून दोन जखमींना उपचारासाठी दाखल केले होते, उपचारांती त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळावरून पुरावे संकलित करण्याचं काम पोलीस पथक करत आहे. फेसबुक लाईव्ह आणि इतर काही पुरावे तपासात घेतले जातील.

कोण आहेत अभिषेक घोसाळकर?

अभिषेक घोसाळकर हे शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आहेत. अभिषेक हे मुंबईतील दहिसरच्या वार्ड क्रमांक एकचे माजी नगरसेवक होते. तसेच ते मुंबै बँकेचे संचालक देखील होते. घोसाळकर पिता-पुत्र सध्या उद्धव ठाकरे गटात आहेत. अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी या देखील माजी नगरसेविका आहेत. बोरीवली मतदारसंघात घोसाळकर कुटुंबाची राजकीय ताकद आहे.

You Might Also Like

पीएनबी घोटाळा : हायकोर्टाकडून वाधवान पिता-पुत्राला जामीन मंजूर
नागपूर : डॉ. रवींद्र सिंगल नवे पोलिस आयुक्त
संविधानाला धरून प्रामाणिकपणे वाटचाल व्हावी : सरसंघचालक | BulletsIn
ऍडमिरल आर.एल.परेरा यांचा शताब्दी सोहळा विविध उपक्रमांद्वारे साजरा
उच्च न्यायालयाने धोकादायक लेन ड्रायव्हिंगच्या उल्लंघनांना मान्यता दिली, कठोर नवीन रस्ता सुरक्षा उपाययोजनांचे आदेश दिले

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article खेलो इंडिया क्रीडापटूंना शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत 30.83 कोटींहून अधिक रक्कम जारी
Next Article ‘होमस्केप्स’ अहवालात ग्राहकाच्या व्यक्तिमत्त्वानुसार फर्निचरच्या आवडींवर प्रकाश
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?