मुंबई, 9 फेब्रुवारी, – भारतात घर सजावट पारंपरिक सौंदर्यदृष्टीच्या पलीकडे गेले असून व ते आपली सांस्कृतिक मूल्ये, भावनिक बंध आणि राहाण्याच्या जागेत झालेले क्रांतीकारी बदल यांचे प्रतिबिंब झाल्याचे गोदरेज इंटेरियोने नुकत्याच केलेल्या ‘होमस्केप्स’ या अहवालात नमूद करण्यात आले आहे. गोदरेज इंटेरियो या गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी असेलल्या गोदरेज अँड बॉयसचा प्रमुख व्यवसाय आहे. या अहवालात ग्राहकाच्या व्यक्तिमत्त्वाची अभिव्यक्ती आणि त्यांची मूल्ये घरसजावटीमधून कशाप्रकारे प्रतिबिंबित होतात, ही सजावट आणि त्यांचा वैयक्तिक विकास यांचे नाते किती अतूट आहे यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
या अहवालानुसार २५ टक्के ग्राहकांना घर खरेदी करताना त्यांच्या वैयक्तिक वापरासाठी जागा असल्याचे निश्चित केले. ही जागा त्यांना आपल्या वैयक्तिक आवडी आणि शांततेसाठी वापरायची असल्याचे त्यांनी सांगितले. या अहवालाच्या सर्वात खास बाबींपैकी एक म्हणजे, ५४ टक्के सहभागींनी त्यांचा वैयक्तिक विकास, महत्त्वाकांक्षा, उत्पादनक्षमता यांचे स्टडी टेबल व खुर्चीशी थेट नाते असल्याचे सांगितले. त्यांच्यासाठी दुसऱ्या ठिकाणी असताना लक्ष एकाग्र करणे आणि प्रभावीपणे काम करणे आव्हानात्मक असते. त्याशिवाय सुमारे ६२
टक्के जणांनी मुलांच्या खोलीसाठी स्टडी टेबल निवडताना मुलांना सहभागी करून घेतले जात असल्याचे मत व्यक्त केले. गोदरेज इंटेरियोच्या होमस्केप्स अहवालात आजूबाजूच्या वातावरणातील तर्कशास्त्र व तर्कसुसंगतता विरूद्ध कल्पकता आणि नाविन्य या सध्या सुरू असलेल्या वादावरून खास तपशील देण्यात आले आहेत. हा अहवाल ग्राहकाच्या अतिशय खासगी क्षेत्रात – त्यांच्या घरात डोकावणारा आहे. त्यामध्ये कार्यक्षमता आणि रचनात्मक कौशल्यावर जास्त भर असल्याचे नमूद करण्यात आले असून २८ टक्के ग्राहकांनी आपण रचनेबाबत टोकाचे आग्रही असल्याचे, वस्तू जराशा इकडे-तिकडे झाल्या, किंवा घरातील मदतनीसांकडून नकळतपणे हलवल्या गेल्या, तरी अस्वस्थ होत असल्याचे सांगितले.
गोदरेज इंटेरियोचे व्यवसाय प्रमुख आणि वरिष्ठ उपाध्यक्ष स्वप्नील नगरकर यांच्या मते ‘होमस्केप्स अहवालात एखाद्या व्यक्तीचे त्यांचे कुटुंब आणि घराशी असलेले सखोल भावनिक बंध उलगडण्यात आले आहेत. आमचे संशोधन ग्राहकांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या घटकाविषयी – घराविषयी भावना उलगडणारे आहे. या सर्वेक्षणातील डेटा दृष्टीकोनात बदल झाल्याचे सुचवणारा असून ग्राहक उपयुक्तता आणि सौंदर्य याला महत्त्व देत असून घराच्या बाबतीत जास्त रचनात्मक तसेच स्वागतपूर्ण झाले आहेत. गोदरेज इंटेरियोमध्ये आम्ही आरामदायीपणा आणि सौंदर्याला प्राधान्य देत चांगल्या प्रकारे डिझाइन केलेले, उपयुक्त फर्निचर तयार करतो, जे तुमच्या घराची सजावट आणखी आकर्षक बनवतात.’
गोदरेज इंटेरियो सौंदर्य तसेच आरामदायीपणाला महत्त्व देणारी आणि पर्यायाने उत्पादनक्षमता वाढवणारी उत्पादने तसेच सेवा बनवण्यात आघाडीवर आहे. त्यामध्ये ईझीफ्लेक्स रचनेचा समावेश असलेली मोशन चेयर बसल्यानंतरच्या वेगवेगळ्या स्थितीत पाठीला जास्तीत जास्त आधार देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. आणखी एक उल्लेखनीय उत्पादन म्हणजे थ्रिल चेयर जे वेगवेगळ्या प्रकारची उपयुक्तता, वैयक्तिक आवडीनुसार सेटिंग्ज आणि आधुनिक टेक्सर्च व रंग देते. त्यामुळे ही खुर्ची आधुनिक सजावटीला साजेशी ठरते. खास तयार करण्यात आलेल्या सेट्समध्ये स्टडी टेबल्स उदा. चॉकलेट व्ही२ स्टडी टेबल आणि अद्रिया वर्कडेस्कचा समावेश आहे. त्यामुळे बेडरूममध्येच व्यवहार्य आणि उत्पादनक्षम जागा तयार करणे शक्य होते. ही स्टडी टेबल्स बेडरूम किंवा लिव्हिंग रूममध्ये सहजपणे वापरता येतात व तिथल्या सजावटीला साजेशी ठरतात.
या सर्वेक्षणात बेंगळुरू, हैद्राबाद, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि लखनौ अशा सात शहरांतील २८२२ जण सहभागी झाले होते.
