नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर : भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाने, जिओ टेक्स्टटाईल (गुणवत्ता नियंत्रण) आदेश, 2022 च्या अंमलबजावणीला मुदतवाढ देण्याची घोषणा केली आहे. आधी हा गुणवत्ता नियंत्रण आदेश सात ऑक्टोबर 2023 ला लागू होणार होता, मात्र आता तो 1 जानेवारी 2024 पासून लागू होणार आहे.
विविध कंपन्यांनी, भारतीय मानक ब्यूरोने निश्चित केलेल्या मापदंडाचे अनुपालन करण्यासाठी तसेच दिनांक 10 एप्रिल 2023 आणि त्यानंतरचा जिओ टेक्सटाइल (गुणवत्ता नियंत्रण) दुरुस्ती आदेश, 2022, S.O 1706(E) अंतर्गत समाविष्ट असलेल्या 19 वस्तूंसाठी भारतीय मानक ब्यूरो मध्ये सुरू असलेल्या प्रमाणन प्रक्रियेसाठी, काही वेळ दिला जावा अशी विनंती केली होती. त्यांच्या विनंतीची दखल घेत, या आदेशाची अंमलबजावणी पुढे ढकलण्यात आली आहे.
या मुदतवढीशी संबंधित राजपत्र अधिसूचना जारी केली जात आहे. हे सर्व कापड ती पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये वापरली जातात, त्यामुळे वस्त्रोद्योग मंत्रालयाने या उत्पादनांची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी आपली वचनबद्धता व्यक्त केली आहे.
