cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > मुंबईत आढळल्या पक्ष्यांच्या विविध 274 प्रजाती
National

मुंबईत आढळल्या पक्ष्यांच्या विविध 274 प्रजाती

CliQ INDIA
Last updated: February 21, 2024 10:41 am
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE

मुंबई, 20 फेब्रुवारी : वार्षिक पक्षी गणनेत मुंबईत पक्ष्यांच्या 274 प्रजाती आढळून आल्या आहेत. यापूर्वी 2023 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात 300 पेक्षा जास्त पक्ष्यांच्या प्रजाती आढळल्या होत्या. यात मुंबई महानगर परिसरातच सुमारे 250 प्रजाती आढळून आल्या होत्या. 2022 मध्ये 250 व 2021 मध्ये 189 तसेच 2020 मध्ये 192 आणि 2019 मध्ये 234 पक्ष्यांच्या प्रजाती आढळून आल्या होत्या.

मुंबईसह राज्यभरात नुकतीच वार्षिक पक्षी गणना आयोजित करण्यात आली होती. या गणनेत राज्यभरातील पक्षीनिरीक्षकांनी सहभाग घेऊन पक्ष्यांच्या विविध प्रजातींचा शोध घेऊन त्यांची नोंद केली. या पक्षी गणनेचे निष्कर्ष एकत्रित केले जात असून लवकरच त्याची माहिती जाहीर केली जाईल अशी माहिती निसर्गतज्ज्ञ आणि लेखक तसेच या पक्षी गणना मोहिमेचे आयोजक संजय मोंगा यांनी दिली.

मुंबईतील पक्षीनिरीक्षक डॉ. सलील चोक्सी यांच्या नेतृत्वाखाली पाच जणांच्या टीमने जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड भागात 15 किलोमीटरच्या परिसरात फेरी मारून लोखंडवाला कॉम्प्लेक्स, पवई आणि भांडुपमधील आयआयटी-बॉम्बे कॅम्पसमधील दलदलीच्या भागातील पक्ष्यांची नोंद केली. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे सक्रीय कार्यकर्ते असलेले डॉ. चोक्सी म्हणाले, ‘आम्ही पक्ष्यांच्या एकूण 82 प्रजाती पाहिल्या असून ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. शहराच्या सीमा वाढत आहेत आणि प्रदूषणातही वाढ होतय. तरीसुद्धा शहरी भागात अजूनही मोठ्या प्रमाणात पक्ष्यांची विविध प्रजाती पाहणे शक्य आहे. पक्षी निरीक्षणासाठी मुंबईबाहेर जाण्याची गरज नाही.’ असं चोक्सी म्हणाले.

पक्षीनिरीक्षकांच्या टीमला अपेक्षेप्रमाणे स्थलांतरित व स्थानिक पक्षी दिसले. लोखंडवाला संकुलात कोरल टिंबा, आयआयटी कॅम्पसमध्ये जांभळा सूर्यपक्षी, जंगली घुबड, भांडुप पंपिंग स्टेशन परिसरात रोहित पक्षी, टी. एस. चाणक्य पाणथळ परिसरात भुऱ्या रंगाचा चिखल्या ठाणे जिल्ह्यातील कर्वे पाणथळ जागेत दिसलेला काळ्या डोक्याचा खंड्या पक्षी आणि विवा पाणथळ जागेत दिसलेला भारतीय नीलपंख पक्षी ही या पक्षीनिरीक्षण अभियानातील काही ठळक वैशिष्ट्ये होती. मीरारोड येथील रॉयल कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्समध्ये ‘नेचर क्लब’च्या प्रमुख असलेल्या राधिका डिसोझा या 2008 पासून अशा पक्षी गणनेत भाग घेत आहेत. त्यांनी यावेळी 40 विद्यार्थ्यांना सोबत घेत पक्षी गणनेत सहभाग घेतला होता. त्यांना एकूण 80 प्रजाती आढळून आल्या. त्या पहाटे साडेपाच वाजेपासून पक्षीनिरीक्षणाचे काम सुरू करत असत. ‘मी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन विरार-वसईचा किल्ला, ठाण्याची खाडी आणि अखेरीस आयआयटी पवईतील विवा पाणथळ जागेत पक्षीनिरीक्षण केले. पक्षी निरीक्षणाचे काम करणाऱ्या अनेकांच्या सहवासात वेळ घालवल्यामुळे विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळते’ असं डिसोजा यांनी सांगितले.

You Might Also Like

सम्राट चौधरी यांना बिहार मुख्यमंत्री म्हणून शपथ दिली जाते, भाजप युग सुरू
दहशतवाद्यांना मारण्यासाठी नियम कशाला हवेत..? : एस. जयशंकर
एअर इंडियाला दंड DGCA ने व्हीलचेअर प्रकरणी एअर इंडियाला 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला
जम्मू-काश्मीरमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानी घुसखोराला बीएसएफकडून अटक
राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा सरकारने स्विकारला

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article ‘हप्पू की उलटन पलटन’मधील गीतांजली मिश्रा यांनी आपली १० वर्षांची बचत केली दान
Next Article रेडिओच्या आवाजाचा अनभिषिक्त सम्राट हरपला – उपमुख्यमंत्री अजित पवार
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?