बंगळुरू: कर्नाटकची राजधानी असलेल्या बेंगळुरू शहरातील कॅफेमध्ये आज, शुक्रवारी दुपारी भीषण स्फोट झाला. स्थानिक रामेश्वरम कॅफेत झालेल्या या स्फोटात 5 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती कर्नाटक पोलिसांनी दिली.
बेंगळुरू शहरातील राजाजीनगर येथील कॅफेच्या व्हाईटफिल्ड शाखेत शुक्रवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास हा स्फोट झाला.स्फोटाचे कारण अजुनही समजलेले नाही, दहशतवादी हल्ला असल्याचा दावा फेटाळून लावला आहे. पोलिसांनी परिसराला वेढा घातला असून मदत आणि बचावकार्य सुरू आहे. दरम्यान बंगळुरू सेंट्रल मतदार संघाचेचे भाजप खासदार पीसी मोहन यांनी ट्विटरवर (एक्स) अपलोड केलेल्या संदेशात म्हंटले आहे की, रामेश्वरम कॅफेमधील गूढ स्फोटाबद्दल ऐकून ते चिंतेत आहेत. पीडित लोक आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना असल्याचे त्यांनी नमूद केलेय. हा स्फोट गॅस सिलेंडरचा असू शकतो अशी शक्यता वर्तवली जात असतानाच पीसी मोहन यांच्या ट्विटमुळे या स्फोटाच्या कारणांवर संशय निर्माण झालाय.
