मुंबई, 17 ऑक्टोबर : भारतीय अन्न महामंडळाच्या (एफसीआय) महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालयाने जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून खुल्या बाजारात विक्री योजना (स्थानिक) अंतर्गत गव्हाच्या विक्रीचा प्रस्ताव सुरू केला आहे.
गव्हाच्या साठ्याची खरेदी करण्यासाठी इच्छुक असलेल्या खरेदीदारांना एफसीआयच्या ई-लिलाव सेवा पुरवठादार “ एम जंक्शन सर्विसेस लिमिटेड” https://www.valuejunction.in/fci/ वर स्वतःला सूचीबद्ध करता येईल आणि साठ्यासाठी बोली लावता येईल. ज्या खरेदीदाराला आपले नाव नोंदवायचे आहे अशा कोणत्याही पक्षासाठी पॅनेलमध्ये समाविष्ट होण्याची प्रक्रिया 72 तासात पूर्ण होईल. प्रक्रियाकर्ते, पिठाच्या गिरण्या, गव्हाच्या उत्पादनांची निर्मिती करणारे या प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. गोवा राज्यासह संपूर्ण महाराष्ट्र विभागात 25 डेपोंमधील 9 हजार एमटी गव्हाचा साठा गुरुवारी 18 ऑक्टोबर रोजीच्या लिलावासाठी देण्याचा प्रस्ताव आहे. खुल्या बाजारातील विक्री योजना(स्थानिक) मुळे भाववाढीला आळा बसेल आणि सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल.
