cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > हवाई दलाने भविष्यातही नवनवे सन्मान आणि प्रतिष्ठा मिळवत राहावे – सीडीएस जनरल अनिल चौहान
National

हवाई दलाने भविष्यातही नवनवे सन्मान आणि प्रतिष्ठा मिळवत राहावे – सीडीएस जनरल अनिल चौहान

CliQ INDIA
Last updated: October 9, 2023 4:28 pm
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE

नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर : एकविसाव्या शतकातील आव्हानांचा सामना करण्यास भारतीय हवाई दल सज्ज असून त्यासाठी, आधुनिककरण, नवोन्मेष आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य घेण्यास भारत वचनबद्ध आहे. भारतीय हवाई दलाने भविष्यातही नवनवे सन्मान आणि प्रतिष्ठा मिळवत राहावे, असे प्रतिपादन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी केले.

आज 92 व्या भारतीय हवाई दल दिननिमित्त सीडीएस चौहान यांनी हवाई दलातील सर्व योद्धे, ज्येष्ठ, सेवानिवृत्त सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत. हा ऐतिहासिक दिन, भारतीय हवाई दलाच्या जवळपास 100 वर्षांच्या कालखंडातील देशाप्रतीची अतुलनीय सेवा आणि समर्पण यांचे स्मरण करण्याचा, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आज जेव्हा आपण हवाई दल दिन साजरा करतो आहोत, त्याच वेळी आपण देशाच्या संरक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या हुतात्मा जवानांनाही श्रद्धांजली वाहतो आहोत, त्यांचे धैर्य, शौर्य आणि समर्पण कायमच भारतातल्या सर्व पिढ्यांना प्रेरणा देत राहील.

ते पुढे म्हणाले की, आपल्या 92 व्या हवाई दल दिनी, आपण सर्वांनी एकत्रित येऊन, भारतीय हवाई दलाचा सन्मान करूया. आपले आकाश आणि आपले भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी मोठ्या उंचीवर झेप घेणाऱ्या हवाई दलातील सर्वांप्रति आपली कृतज्ञता व्यक्त करूया. देशाची ताकद आणि संकल्प यांचे प्रतीक म्हणून हे पुढेही कायम राहणार आहे.

देशाने लढलेल्या प्रत्येक युद्धात, भारतीय हवाई दलाने अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडली आहे. शत्रूच्या आगळिकीला प्रत्युत्तर देणारे आक्रमक हवाई हल्ले करणे, युद्धग्रस्त भूमीतून, परदेशस्थ भारतीयांना सुरक्षित मायदेशी आणणे आणि सीमेलिकडे जाऊनही कोणत्याही संकटात मानवी सहाय्य आणि आपत्तीच्या काळात मदत करण्यात हवाई दलाने महत्वाचे कार्य केले आहे. तसेच भारताच्या मित्र राष्ट्रांसोबत होणाऱ्या संयुक्त युद्ध सरावात भारतीय हवाई दलाने, नियमित आणि यशस्वी सहभाग नोंदवला आहे. जागतिक हवाई दलांसोबत अत्यंत उत्तम सहकार्य करण्याचा प्रत्यय भारताने नेहमीच दिला असून आपल्या शेजारी देशात किंवा त्या पलीकडे देखील, प्रभावीपणे कारवाई करण्याची आपली क्षमता हवाई दलाने सिद्ध केली आहे.

‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाअंतर्गत, भारतीय हवाई दलाने स्वदेशी संरक्षण उत्पादनांच्या माध्यमातून आपला क्षमता विकास करण्यास प्रोत्साहन दिले आहे. भविष्यातील युद्धसज्जतेसाठी, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर, अवकाश आणि सायबर क्षमता वाढवणे अशा प्रयत्नातून हवाई दलाची क्षमता वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित निर्णय साधने आणि प्रणाल्यांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे जसे की, स्वॉर्म अनमानेड युद्ध प्रणाली ही भारतीय हवाई दलाने आयोजित केलेल्या मेहर बाबा ड्रोन स्पर्धेद्वारेच या दलाला मिळाली आहे.

You Might Also Like

दहशतवाद्यांना मारण्यासाठी नियम कशाला हवेत..? : एस. जयशंकर
राजकारण हा आता शो बिझनेस – भालचंद्र कानगो
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात राजाजी उत्सवाची घोषणा केली; सी. राजगोपालाचारी यांचा पुतळा वसाहतकालीन प्रतीकाची जागा घेणार आहे.
भाजपकडे ऐतिहासिक बंगाल विजयाची हार्टा असल्याचा एक्जिट पोलचा अंदाज, २०२६ मध्ये मोठा विजय
भ्रष्टाचार प्रकरणात पुराव्याअभावी प्रफुल्ल पटेलांना सीबीआयकडून क्लीनचीट

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article विमानांची संख्या वाढण्यास लागणार महिना
Next Article रत्नागिरी : केईएममधील रुग्ण, नातेवाईकांना मोफत डबे
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?