cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > सहकार मंत्रालयाची सोमवारी दिल्लीत मंथन बैठक
National

सहकार मंत्रालयाची सोमवारी दिल्लीत मंथन बैठक

CliQ INDIA
Last updated: June 29, 2025 6:36 am
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE

* सहकारी क्षेत्राला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण चर्चा

* राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार मंत्र्यांची उपस्थिती

नवी दिल्ली, 28 जून (हिं.स.)

: भारत सरकारच्या सहकार मंत्रालयातर्फे 30 जून रोजी नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार मंत्र्यांची मंथन बैठक केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे.

सहकारी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या बैठकीत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे सहकार मंत्री तसेच सहकार विभागांचे अतिरिक्त मुख्य सचिव, प्रमुख सचिव आणि सचिव सहभागी होणार आहेत.

या मंथन बैठकीचे मुख्य उद्दिष्ट सहकार मंत्रालयाच्या आतापर्यंतच्या उपक्रमांचा आणि योजनांचा सर्वंकष आढावा घेणे, प्रगतीचे मूल्यमापन करणे आणि राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांकडून अनुभव, उत्तम पद्धती आणि रचनात्मक सूचनांचे आदान-प्रदान सुनिश्चित करणे आहे. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या ‘सहकारातून समृद्धी’ या दृष्टिकोनाला सामूहिक प्रयत्नांद्वारे पुढे नेण्यासाठी ही बैठक समन्वयित रणनीती विकसित करण्यासाठी प्रयत्न करेल.

या बैठकीत ग्रामीण भागात सेवा वितरण सुधारण्यासाठी 2 लाख नवीन बहुउद्देशीय प्राथमिक कृषि कर्ज सोसायट्या (PACS), डेअरी आणि मत्स्य सहकारी समित्यांच्या स्थापनेवर चर्चा होईल. याशिवाय, खाद्य सुरक्षा बळकट करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे सशक्तीकरण करण्यासाठी ‘विश्वातील सर्वात मोठी अन्न भंडारण योजना’ यावर विचारविनिमय केला जाईल. ‘सहकारातून सहकार’ मोहीम आणि ‘आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष 2025’ अंतर्गत राज्यांची प्रगती आणि सहभाग यावरही चर्चा होईल.

राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेड (NCEL), राष्ट्रीय सहकारी ऑर्गेनिक्स लिमिटेड (NCOL) आणि भारतीय बीज सहकारी समिति लिमिटेड (BBSSL) या तीन नवीन बहु-राज्यीय राष्ट्रीय सहकारी संस्थांमधील राज्यांचा सहभाग तपासला जाईल. श्वेत क्रांति 2.0 अंतर्गत डेअरी क्षेत्रात सर्कुलर अर्थव्यवस्था आणि टिकाऊपणाला प्रोत्साहन देणे, तसेच आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत डाळी आणि मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी समर्थन किंमती यावरही चर्चा होईल. PACS आणि सहकारी समित्यांच्या रजिस्ट्रार (RCS) कार्यालयांचे संगणकीकरण, राष्ट्रीय सहकारी डेटाबेस आणि त्याचा धोरण निर्मितीतील उपयोग यासारख्या डिजिटल परिवर्तनाच्या उपक्रमांचा आढावा घेतला जाईल.

याशिवाय, त्रिभुवन सहकारी युनिव्हर्सिटीच्या स्थापनेसह सहकारी क्षेत्रातील मानव संसाधन विकास, प्रशिक्षण आणि क्षमता निर्माण यावरही चर्चा होईल. सहकारी बँकांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने उचललेल्या पावलांचा आढावा घेतला जाईल, ज्यात सहकारी बँकांशी संबंधित समस्यांचे निराकरण, राज्य सहकारी बँका (StCBs) आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसाठी (DCCBs) साझा सेवा इकाई (SSE) आणि शहरी सहकारी बँकांसाठी (UCBs) छत्रसंस्थेचे संचालन यांचा समावेश आहे.

—————

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी

You Might Also Like

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचा २५ जानेवारीला ई लिवाव
भारत-श्रीलंका यांच्यात गाढे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सभ्यता विषयक संबंध – ओम बिर्ला
पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार | BulletsIn
विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार – Hindusthan Samachar Marathi
झारखंडमध्ये एक कोटीचे बक्षीस असलेल्या अनलसह १1 नक्षलवाद्यांचा खात्मा

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article सोलापूर : संगोगी ‘जलजीवन’ कामाचा भोंगळ कारभार
Next Article श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंतर बांगलादेशचा नझमुल हुसेन कर्णधारपदावरुन पायउतार
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?