ढाका, 28 जून (हिं.स.) :
श्रीलंका
दौऱ्यावर कोलंबोमध्ये बांगलादेश संघाचा एक डाव आणि ७८ धावांनी पराभव होताच,बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतोने मोठा
निर्णय घेत कर्णधारपदाचा राजीनामा दिला. नझमुल हुसेन म्हणाला की, कर्णधारपद सोडण्याचे खरे कारण
श्रीलंकेविरुद्धचा पराभव नव्हता तर बोर्डाचा निर्णय होता. ज्यामध्ये बांगलादेश
क्रिकेट बोर्डाने तिन्ही फॉरमॅटसाठी तीन नवीन कर्णधार नियुक्त करण्याची घोषणा केली
होती. शांतो याच्याशी सहमत नाही आणि त्यामुळे त्याने कसोटी क्रिकेटच्या
कर्णधारपदाचा राजीनामा दिला.
श्रीलंकेविरुद्ध
कसोटी मालिका ०-१ ने गमावल्यानंतर कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर करताना शांतो
यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की,मला आता या फॉरमॅटमध्ये कर्णधारपद भूषवायचे
नाही. हे वैयक्तिक नाही आणि मी संघाच्या हितासाठी हा निर्णय घेतला आहे. मला वाटते
की, यामुळे संघाला मदत होईल आणि तीन वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी तीन वेगवेगळे कर्णधार
ठेवण्याची कल्पना योग्य नाही. बोर्डाची योजना काय आहे हे मला माहित नाही पण मी
त्यांना पाठिंबा देईन. हा माझा निर्णय आहे आणि मला वाटते की, तीन कर्णधार एका
संघासाठी योग्य नाहीत.
नझमुल
हुसेनने २०२३ मध्ये बांगलादेशचे कसोटी कर्णधारपद स्वीकारले होते. १४ कसोटी सामन्यांमध्ये त्याने बांगलादेशचे
नेतृत्व केले. आणि कर्णधार म्हणून पाकिस्तानमध्ये दोन कसोटी सामने जिंकले आहेत.
नझमुल हुसेन शांतोच्या नावावर एकूण चार विजय आहेत आणि त्याला नऊ कसोटी सामने गमाववे
लागले आहेत. श्रीलंका दौऱ्यावरील पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला तो त्याच्या
नेतृत्वाखाली अनिर्णित राहिलेला पहिला सामना होता.
—————
हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra
