cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > भारत-श्रीलंका यांच्यात गाढे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सभ्यता विषयक संबंध – ओम बिर्ला
National

भारत-श्रीलंका यांच्यात गाढे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सभ्यता विषयक संबंध – ओम बिर्ला

CliQ INDIA
Last updated: August 30, 2025 6:42 am
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली, 29 ऑगस्ट (हिं.स.) – भारत आणि श्रीलंका यांच्यात गाढे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सभ्यता विषयक संबंध आहेत. आज, हे बंध एका मजबूत, बहुआयामी भागीदारीत परावर्तित झाले आहेत. भारताच्या ‘शेजारी राष्ट्र प्रथम’ धोरणात आणि ‘व्हिजन सागर’मध्ये श्रीलंकेला विशेष स्थान आहे, असे शिष्टमंडळाचे स्वागत करताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले.

श्रीलंकेचे संसदीय शिष्टमंडळ 26 ते 30 ऑगस्ट दरम्यान भारताच्या दौऱ्यावर आहे. या शिष्टमंडळात 20 संसद सदस्य आणि 4 संसदीय कर्मचारी यांचा समावेश आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काल, गुरुवारी संसद भवन संकुलात श्रीलंका-भारत संसदीय मैत्री संघटनेच्या 24 सदस्यीय उच्चस्तरीय शिष्टमंडळाची भेट घेतली. या शिष्टमंडळाचे नेतृत्व श्रीलंकेचे आरोग्य आणि जनसंवाद मंत्री तसेच श्रीलंका-भारत संसदीय मैत्री संघटनेचे अध्यक्ष डॉ. नलिंदा जयतिस्सा यांनी केले.

श्रीलंकेच्या संसदेत भारत-श्रीलंका संसदीय मैत्री संघटनेची स्थापना झाल्याबद्दल बिर्ला यांनी आनंद व्यक्त केला. ही संघटना म्हणजे द्विपक्षीय संबंधांच्या बळकटीचे प्रतीक असल्याचे बिर्ला यांनी सांगितले. लोकशाही पद्धती आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचे अनुभव सामायिक करण्यासाठी दोन्ही देशांच्या संसदांमध्ये संस्थात्मक सहकार्य आणि नियमित संवादाची आवश्यकता लोकसभा अध्यक्षांनी अधोरेखित केली. अशा देवाणघेवाणीमुळे लोकशाही मूल्ये आणखी मजबूत होतील असे त्यांनी सांगितले.

भारतीय संसदेत कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आणि डिजिटल नवोन्मेषाचा वापर पारदर्शकता, कार्यक्षमता आणि कामकाजात सुलभता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरला असून त्यातून कागदविरहित कामकाजाला प्रोत्साहन मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

श्रीलंकेच्या आर्थिक संकटाच्या काळात प्रथम प्रतिसाद देणारा देश म्हणून डॉ. नलिंदा जयतिस्सा यांनी भारताचे आभार मानले. तसेच हिंद महासागर प्रदेशात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यात भारताच्या भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली. आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील भारताचे सहकार्य श्रीलंकेसाठी जीवनरेखा ठरल्याचे वर्णन त्यांनी केले.

—————

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी

You Might Also Like

2026 च्या विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांच्या निवडीची महत्त्वाची प्रक्रिया सुरू झाल्याने, केरळ काँग्रेसच्या छाननी समितीची दिल्लीत बैठक झाली.
दरवर्षी किमान ५,००० रुपयांचे खादी कपडे खरेदी करा – अमित शाह
सर्वोच्च न्यायालयाने न्यायिक भ्रष्टाचारावरील वादग्रस्त NCERT पाठ्यपुस्तकातील प्रकरणावर बंदी घातली, अधिकाऱ्यांकडून जबाबदारी मागितली
निवडणुकांची घोषणा झाल्यावर सुविधा पोर्टलवर 73,379 अर्ज प्राप्त
मणिपूर, त्रिपुरा, मेघालयच्या राज्य स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांकडून अभिनंदनपर शुभेच्छा

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article रशियाने युक्रेनियन नौदलाचे मोठे जहाज बुडवले
Next Article गणेशोत्सव : टिळकांच्या प्रेरणेपासून ‘राज्य महोत्सव’पर्यंतचा प्रवास
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?