cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > पीएम-मुख्यमंत्री, मंत्र्यांच्या अटकेशी संबंधित विधेयकावर विरोधकांचा लोकसभेत तीव्र विरोध
National

पीएम-मुख्यमंत्री, मंत्र्यांच्या अटकेशी संबंधित विधेयकावर विरोधकांचा लोकसभेत तीव्र विरोध

CliQ INDIA
Last updated: August 21, 2025 6:36 am
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE

नवी दिल्ली , 20 ऑगस्ट (हिं.स.)।केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत संविधान (१३०वी दुरुस्ती) विधेयक, 2025, केंद्रशासित प्रदेश सरकार (दुरुस्ती) विधेयक, 2025, तसेच जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना (दुरुस्ती) विधेयक, 2025 सादर केले. या विधेयकांवर लोकसभेत जोरदार गोंधळ झाला.सरकारने गंभीर गुन्हेगारी आरोपांमुळे अटक किंवा कोठडीत असलेल्या व्यक्तींना पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, किंवा केंद्रशासित प्रदेशातील मुख्यमंत्री/मंत्री पदावरून हटवण्याची तरतूद या विधेयकांद्वारे करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

गृहमंत्री अमित शाह यांनी हे विधेयके लोकसभेत सादर केली. यानंतर विपक्षी खासदारांनी या विधेयकांचा तीव्र विरोध केला. काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी आणि एआयएमआयएम चे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी हे विधेयक संविधानविरोधी असल्याचा आरोप केला.केंद्रीय यंत्रणांनी मनमानीपणे अटक केल्यानंतर विविध राज्यांमधील विरोधी पक्षांच्या सरकारांच्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या पदावरुन काढून टाकून केंद्र सरकार विरोधी पक्षांना अस्थिर करण्यासाठी कायदा आणण्याचा विचार करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला. काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते अभिषेक सिंघवी म्हणाले की, निवडणुकीत पराभव करण्यात अपयशी ठरल्यानंतर केंद्र सरकार विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना काढून टाकण्यासाठी असा कायदा आणू इच्छित आहे.

यावर गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, हे विधेयक घाईघाईने आणल्याचा आरोप चुकीचा आहे. त्यांनी स्पष्ट केले की, हे विधेयक संयुक्त समितीकडे पाठवले जाईल, आणि सर्व पक्षांचे खासदार त्या समितीमध्ये सहभागी असतील. ही समिती सखोल विचारविनिमय करून अहवाल सादर करेल आणि विधेयक पुढे मांडले जाईल.

केंद्रशासित प्रदेश सरकार (सुधारणा) विधेयक २०२५, १३० वी घटनादुरुस्ती विधेयक २०२५ आणि जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना (सुधारणा) विधेयक २०२५, अशी या विधेयकांची नावे आहेत.यामध्ये केंद्रशासित प्रदेश सरकार कायदा, १९६३ (१९६३ चा २०) अंतर्गत, गंभीर गुन्हेगारी आरोपांमुळे अटक केलेल्या आणि ताब्यात घेतलेल्या मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांना काढून टाकण्याची कोणतीही तरतूद नाही. अशा प्रकरणांमध्ये, मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांना काढून टाकण्यासाठी कायदा करण्याची आवश्यकता आहे. म्हणूनच यासाठी केंद्रशासित प्रदेश सरकार कायदा, १९६३ च्या कलम ४५ मध्ये सुधारणा करण्यासाठी हे विधेयक आणले आहे.

१३० वी घटनादुरुस्ती विधेयक २०२५ घटनेनुसार गंभीर गुन्हेगारी आरोपांवर अटक केलेल्या आणि ताब्यात घेतलेल्या मंत्र्याला काढून टाकण्याची तरतूद नाही. म्हणूनच अशा प्रकरणांमध्ये, पंतप्रधान किंवा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या कोणत्याही मंत्र्यांना आणि राज्यांच्या आणि राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्लीच्या मंत्रिमंडळाच्या कोणत्याही मंत्र्यांना काढून टाकण्यासाठी कायदेशीर चौकट तयार करण्याच्या उद्देशाने संविधानाच्या कलम ७५, १६४ आणि २३९AA मध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.

जम्मू काश्मीर पुनर्रचना कायदा, २०१९ (२०१९ चा ३४) अंतर्गत गंभीर गुन्हेगारी आरोपांवर अटक केलेल्या आणि ताब्यात घेतलेल्या मुख्यमंत्री किंवा मंत्र्याला काढून टाकण्याची कोणतीही तरतूद नाही. म्हणूनच या नवीन विधेयकाद्वारे जम्मू काश्मीर पुनर्रचना कायदा, २०१९ च्या कलम ५४ मध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.

मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना ५ वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाल्यास अटक केली जाईल. ३० दिवस सतत कोठडीत राहिल्यास त्यांना पदावरून काढून टाकता येईल. पंतप्रधान राष्ट्रपतींकडे पदावरून काढून टाकण्याची शिफारस करतील. जर त्यांनी अटकेच्या ३१ व्या दिवसापर्यंत राजीनामा दिला नाही तर ते स्वतःच पायउतार होतील. पंतप्रधानांनी शिफारस केली नाही, तरी ३१ व्या दिवशी ते पद गमावतील. नवीन कायद्याच्या कक्षेत पंतप्रधान, मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्री यांचा समावेश असणार आहे.

—————

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode

You Might Also Like

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ
केरळमधील फटाके उत्पादन केंद्रातील स्फोटात १३ जण ठार, थ्रिस्सूरमध्ये दहशत
समृद्धी महामार्ग अपघात – मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर
गाझियाबाद : इंटेलिजेंस ब्युरोमध्ये कार्यरत असलेल्या तरुणाची बहिणीसह आत्महत्या
सुप्रीम कोर्टाने फेटाळला सिसोदियांचा जामीन अर्ज

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article ‘भारत आमच्यासाठी खूप महत्त्वाचा’- रशियाचा अमेरिकेला स्पष्ट संदेश
Next Article खेड्यापाड्यात अक्षरशः मुरली . बंद्रीझिरा’ पशु सौंदर्याची परंपरा !
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?