दिल्ली आबकारी घोटाळा प्रकरणी दिलासा नाहीच
नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांचा जामीन अर्ज आज, सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला. सिसोदिया यांच्यावर दिल्लीच्या आबकारी धोरणात अनियमीतता केल्याचा आरोप आहे.
न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्या. एसव्हीएन भाटी यांच्या खंडपीठाने सीबीआय आणि ईडीचे वकील अभिषेक सिंघवी आणि अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एसव्ही राजू यांची सुनावणी घेतल्यानंतर 17 ऑक्टोबर रोजी, सिसोदियाच्या दोन वेगवेगळ्या जामीन याचिकांवर निर्णय राखून ठेवला होता. त्यानंतर आज, सोमवारी सुप्रीम कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. यासोबतच दिल्ली अबकारी धोरण घोटाळा प्रकरणातील सिसोदिया यांच्या भूमिकेची सुनावणी 6 ते 8 महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान सुनावणी धीम्या गतीने झाल्यास सिसोदिया पुन्हा जामिनासाठी अर्ज करू शकतात असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
हिंदुस्थान समाचार
