नाशिक, ०६ ऑक्टोबर (हिं.स.) : नाशिक शहरात कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज सापडल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी ही मोठी कारवाई केली असून ड्रग्ज बनविणारा कारखानाच उध्वस्त केला आहे. मुंबई पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर ड्रग विक्री करण्याचे मोठे रॅकेटच समोर येणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वीच ड्रग्ज माफिया ललित पाटील आजारीपणाच्या कारणावरून येरवडात तुरुंगातून पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल झाला होता त्याचवेळी ससून रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ड्रग विक्री करताना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ललित पाटील याला रंगीहात पकडले होते पण त्यांच्या हातावरती तुरी देऊन ललित पाटील हा ससून रुग्णालयातून फरार झाल्याची घटना घडली. या प्रकरणानंतर ड्रग्ज विरोधी कारवाईसाठी पोलीस ‘ॲक्शन मोड’वर आले आहे.
याचपार्श्वभूमीवर साकीनाका पोलिसांनी नाशिक शहर पोलीस हद्दीत मोठी कारवाई करत दीडशेहुन अधिक किलो एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. नाशिक पोलिसांच्या नाकावर टिच्चून श्री. गणेशाय इंडस्ट्रीज या कंपनीत ड्रग्ज निर्मिती सुरू होती. ड्रग्स माफिया ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील नाशिकच्या शिंदे पळसे परिसरात हा ड्रग्सचा कारखाना चालवत होता. याबाबत माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी कारवाई करत कारखानाच उध्वस्त केला आहे. सुमारे 250 कोटी रुपयांचे ड्रग्ज आणि टेम्पो इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे एमडी ड्रग्जहे नासिक पुणे मुंबई नागपूर या शाळा शहरातील शाळा व महाविद्यालयांमध्ये सरसपणे विकली जात होती विशेष म्हणजे हे ड्रग्ज सेवन केल्यानंतर त्यापासून सुटका ही माणूस मेल्यानंतरच होते असे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार सांगण्यात येत आहे परंतु या व्यसनाच्या आधी होण्यासाठी काही पेंडल नियुक्त करण्यात आले होते आणि त्यांच्या माध्यमातून हा धंदा राजरोसपणे केला जात होता.
हिंदुस्थान समाचार
