चंडीगड, २७ जानेवारी (हिं.स.)पंजाब पोलिसांनी काल रात्री अमृतसर येथून गँगस्टर गोल्डी ब्रारच्या पालकांना अटक केली. गोल्डी ब्रारचे पालक दरबार साहिबजवळील एका हॉटेलमध्ये राहत असताना मुक्तसर साहिब पोलिसांनी कारवाई केली. गोल्डी ब्रार हा पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येमागील सूत्रधार आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, गोल्डी ब्रारचे वडील शमशेर सिंग आणि त्याची आई प्रीतपाल कौर यांना अटक करण्यात आली आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी एका शिक्षकाकडून ५० लाख रुपयांची खंडणी मागितण्यात आली होती.या प्रकरणात पोलिसांनी ३ डिसेंबर २०२४ रोजी एफआयआर दाखल केली होती. त्यावेळी बंबीहा टोळी आणि गोल्डी ब्रार एकत्र काम करत होते. पोलिस तपासात असेही समोर आले आहे की गोल्डीच्या कुटुंबाकडे उत्पन्नाचा कोणताही विश्वसनीय स्रोत नव्हता. गुंडाचे पालक खंडणीच्या पैशावर जगत होते.
—————
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे
