नवी दिल्ली, फेब्रुवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी वैज्ञानिक स्वभाव, नवोन्मेष आणि तंत्रज्ञान या विषयावर त्यांचे विचार मांडणारी एक चित्रफीत देखील सामायिक केली आहे.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले. राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या शुभेच्छा. आमचे सरकार युवकांमध्ये संशोधन आणि नवनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी निरंतर कार्यरत आहे. विकसित भारताचे आपले स्वप्न सत्यात साकार करण्यासाठी हे महत्त्वाच आहे.
