नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या भारतीय चमूला शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले, “आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा सुरू होत असताना, मी अतुलनीय भारतीय चमूला माझ्या शुभेच्छा देतो! भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा जीवन प्रवास प्रेरणादायी असतो. मला विश्वास आहे की ते खऱ्या अर्थाने भारतीय खिलाडूवृत्तीची झलक दाखवतील.”
हिंदुस्थान समाचार
