मुर्शिदाबाद, 07 जानेवारी (हिं.स.) : पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये तृणमूल काँग्रेसचे नेते सत्येन चौधरी यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. बहारामपूरच्या चलटियामध्ये रविवारी दुपारी ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, काही लोक बाईकवरून आले आणि त्यांनी टीएमसी नेत्यावर गोळ्या झाडल्या.या घटनेनंतर सत्येन चौधरी यांना मुर्शिदाबादला नेण्यात आले. सत्येन चौधरी पूर्वी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्या जवळचे होते, पण नंतर त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. अलीकडे सत्येन हे सत्ताधारी पक्षापासून लांब राहत होते. रविवारी दुपारी, काही लोकांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.सत्येन चौधरी यांच्यावर गोळी झाडल्यानंतर त्यांना तातडीने मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून परिसरात खळबळ उडाली आहे.
हिंदुस्थान समाचार
