पुणे, 30 जानेवारी : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. जुना मुंबई पुणे हायवेवर बनावट दारूच्या 60 हजार बाटल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केल्या आहेतमामुर्डी गावाजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही धडक कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एक ट्रक जुना मुंबई पुणे हायवे रोडवर, मामुरडी गावाजवळ येथून जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. यानुसार, सापळा रचून अधिकारी कर्मचाऱ्यांनी तो ट्रक (DD-०१-२-९२०५) अडवला आणि त्याची तपासणी केली. या ट्रक मध्ये गोवा राज्यात निर्मित बनावट देशी दारू रॉकेट संत्रा ९० मि.ली. क्षमतेच्या ६०,००० बाटल्या (६०० बॉक्स) एवढा मुद्देमाल मिळुन आला. या मुद्देमालाची किंमत तब्बल २१ लाख रुपये इतकी आहे. या गुन्ह्यात १५ लाखाच्या वाहनासह एकूण ३६ लाख रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.
