जळगाव , 9 फेब्रुवारी : बंद घर फोडून घरातून सोन्याचांदीचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल, ब्रेसलेट असा एकूण ४९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शहरातील जाणता राजा नगर परिसरातून समोर आली आहे. या संदर्भात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राची हेमराज भावसार (४८) या आपल्या परिवारासह राहायला असून त्यांचे घर बंद असताना अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत घरातील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल आणि चांदीचे ब्रेसलेट असा एकूण ४९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार गुरुवारी सकाळी समोर आला. दरम्यान हा प्रकार लक्षात आल्यानंतर महिलेने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
