cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Crime > पुण्यातून पळाले, अमरावतीत पकडले; क्राईम युनिट एकची कारवाई
Crime

पुण्यातून पळाले, अमरावतीत पकडले; क्राईम युनिट एकची कारवाई

CliQ INDIA
Last updated: November 14, 2023 4:00 am
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

अमरावती, 13 नोव्हेंबर (हिं.स.) खुनाचा प्रयत्न व खंडणीसाठी केलेल्या अपहरणाच्या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी पुण्याहून अमरावतीत आश्रयास आलेल्या दोन कुख्यात गुन्हेगारांना अमरावती पोलिसांनी अटक केली. १२ नोव्हेंबर रोजी रात्री त्यांना आशियाड कॉलनी चौकातून एका कारमधून ताब्यात घेण्यात आले. दोघांनाही पुणे ग्रामीण पोलिसांच्या सुपुर्द करण्यात आले. ते पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील गुन्हेगारे टोळीचे सदस्य आहेत.

विपुल उत्तम माझिरे (२६, रा. रावडे ता. मुळशी पो. स्टे पौड पुणे ग्रामीण) व प्रदीप उर्फ पंकज धनवे (२७, रा सिंहगड रोड दांडेकर पुल, दत्तवाडी पुणे) अशी अटक आरोपींची नावे आहेेत. तर संतोष धुमाळ (रा मुळशी पूणे) हा तिसरा आरोपी पोलिसांची चाहुल लागताच पळून गेला. पुण्याच्या पौड पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या खुनाचा प्रयत्न व खंडणीसाठी अपहरणाच्या गुन्हयातील संतोष धुमाळ व त्याचे इतर दोन साथीदार हे पूणे येथून पळून अमरावती येथे आश्रयाला आले आहेत, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलिसांकडून अमरावती शहर पोलिसांना ९ नोव्हेंबर रोजी देण्यात आली होती. ती जबाबदारी गुन्हे शाखा युनिट एककडे सोपविण्यात आली.

गु्न्हे शाखा युनिट एकने आरोपीच्या शोधासाठी अमरावती शहरातील हॉटेल, लॉज तसेच आरोपींच्या संभाव्य राहण्याच्या ठिकाणांचा शोध घेतला. दरम्यान १२ नोव्हेंबर रोजी रात्री १२.३० च्या सुमारास स्थानिक गुंड सागर खिराडे याच्यासोबत अन्य शहरातील तीन व्यक्ती कारमधून फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. ती कार आशियाड कॉलनी चौकात ट्रेस झाली. सागर खिराडे हा त्याच्या कारसह दिसून आला. पोलिसांना पाहताच खिराडे हा तेथून अंधाराचा फायदा घेवून एका इसमासह पळून गेला. तर विपुल व प्रदीप हे दोन आरोपी गु्न्हे शाखेच्या हाती लागले.

दोन दिवसांपासून अमरावतीत मुक्कामी

आरोपी हे दोन दिवसांपासून अमरावतीच्या शेगाव परिसरात राहत होते. त्यांना अमरावती येथील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सागर खिराडे याने आश्रय दिल्याची कबुली अटक आरोपींनी दिली. पळून गेलेला संतोष धुमाळ व अटक आरोपी विपुल माझिरे हे मोक्का केसमधील आरोपी असून दोन ते तीन महिन्यांपुर्वीच ते कारागृहातून सुटलेत. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेडडी यांच्या नेतृत्वात वरिष्ठ पोलीस निरिक्षक आसाराम चोरमले व सपोनि मनीष वाकोडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

रेल्वे प्रशासनाची तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांच्या विरोधात कारवाई
पोलिसांशी वादावादी करून अवेळी दुकान चालविणाऱ्या आरोपीची मुक्तता
सोलापुरात दगडफेकीच्या दोन घटना, दोन जण जखमी
तलवारीने जीवघेणा हल्ला; आरोपीला ४ दिवसांची पोलीस कोठडी
बनावट जीएसटी पावत्यांद्वारे 11.61 कोटींची फसवणूक

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article ‘एकदा येऊन तर बघा’ ८ डिसेंबरला तुमच्या भेटीला
Next Article रत्नागिरी : किनारपट्टीवरील गावांना दिलेल्या नोटिसा रद्द करण्याची मागणी
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?