सोलापूर 23 जानेवारी ( हिं.स) शास्त्री नगरात मिरवणुकीवर अनोळखी लोकांनी दगडफेक केली. यात दोघे जखमी झाले. तर एकाला मुकामार लागला. तर शास्त्रीनगरमध्येच एकमेकांवर दगडफेकीची घटना दुसरी घटनाही घडली. याप्रकरणी संशयिताना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नागेश ऊर्फ योगीराज लिंगप्पा हत्तुरे (वय २०, रा. विजापूर नाका झोपडपट्टी, सोलापूर), स्वामी सत्यनारायण निमकंठी (वय ३३, रा. गोदुताई विडी घरकुल, सोलापूर) अशी जखमींची नावे तर सागर सूर्यकांत गलांडे (वय ३३, रा. झोपडपट्टी क्र. दोन, विजापूर नाका, सोलापूर) असे मुकामार लागलेल्याचे नाव आहे. यातील जखमी हे दर्शनासाठी मिरवणुकीने शास्त्रीनगरातील राम मंदिराकडे निघाले होते. तेव्हा अनोळखी लोकानी मिरवणुकीवर दगडफेक केली. यात डोक्यास मार लागून दोघे जखमी झाले. त्यांना टाके पडले आहेत.काठीने गाड्या फोडण्यात आल्या. दुचाकी वाहने रस्त्यावर पडली होती. मुलांसह महिलांनीही बाटल्या, काठीने मारहाण केली. आणखी काहीजण जखमी असल्याचेही जखमींनी सांगितले. जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. याची सिव्हिल पोलिस चौकीत नोंद झाली आहे.
हिंदुस्थान समाचार
