अकोला, 16 सप्टेंबर (हिं.स.)।कोराना काळामध्ये आपले दुकान चालवून तेथे येणाऱ्या पोलिसांना जीवे मारण्याची कृती करून तसेच त्या काळातील असणाऱ्या सर्व नियमांचे उल्लंघन करून आपले ऑम्बलेट सेंटर चालविल्याच्या आरोपाखाली विविध कलमान्वये गुन्हे दाखल असलेल्या आरोपीला ४ थे सह न्यायाधीश आर. एस. सारूक यांच्या न्यायालयाने दोष मुक्त केले आहे .
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नेहरू पार्क येथे रात्री उशिरापर्यंत आपली अंड्याची गाडी चालू ठेवणाऱ्या आरोपीला पोलिसांच्या ताफ्याने गाडी बंद करण्यासाठी सांगितले असता पोलिसांच्या अंगावरती जाऊन त्यांना गरम झाऱ्याने तेल फेकून जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्या कारवाईमध्ये दखलंदाजी करून कोविड काळात रात्री उशिरापर्यंत अस्वच्छतेमुळे आमलेट खाऊ घातल्याचा आरोप असणाऱ्या आरोपी ए ओ खुकेकर याला सिव्हिल लाईन पोलिसांनी भांदवी च्या विविध कलमान्वये दोषारोपित केले होते . चौथे न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी यांच्याकडे शेवटच्या युक्तिवादासाठी आरोपीला आणले असता आरोपीच्या वकिलाने मुद्देसूद बाजू मांडली . आरोपीच्या विधीज्ञांचा प्रभावी युक्तिवाद आणि तर्कसंगत डिफेन्स लक्षात घेऊन न्यायाधीश महोदयांनी भविष्यातील अटी शर्ती लिहून घेऊन आरोपीला खटल्यातून मुक्त केले .
—————
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे
