नाशिक, ०८ नोव्हेंबर (हिं.स.) : मागील भांडणाची कुरापत काढून महिलेला काठीने मारहाण करून तिचा विनयभंग करणाऱ्या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी.की पीडित महिला ही घरी होती. त्यावेळी संशयित संतोष बोडके व कावेरी संतोष बोडके (दोघेही रा. ता.
जि. नाशिक) हे तेथे आले. त्यांनी पीडितेशी मागील भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ व मारहाण केली,तसेच लाकडी काठीने मारून दुखापत करून स्त्रीमनासलज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून पीडितेचा विनयभंग केला. याबाबत देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात बोडके दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाचोरे करीत आहेत.
हिंदुस्थान समाचार
