सोलापूर, 16 जुलै (हिं.स.) : पंढरपूर शहरात माय-लेकाच्या दुहेरी हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना शहरातील कुंभार गल्लीत घडलीये. हत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. याबाबतची माहिती अशी की, कुंभार गल्लीत राहणाऱ्या लखन जगताप आणि त्याची आई सुरेखा जगताप यांना त्यांच्या राहत्या घरी अज्ञाताने धारदार शस्त्राने मारण्यात आले आहे. त्यामध्ये लखनच्या पाठीवर आणि डोक्यावर धारदार शस्त्राचे वार झाले आहेत. तर, सुरेखा जगताप त्यांच्या मानेवर व डोक्यावर वार करून त्यांना मारण्यात आले. मारेकरी हत्या करून घराला कुलूप लावून पसार झाले. लखनचे वडील संजय जगताप घरी आल्यानंतर ही घटना समोर आली.
—————
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड
