अमरावती, 27 जून, (हिं.स.) चांदूर बाजार नानोरी मार्गावरील गजानन लेआउट येथील रात्रीच्या अंधारात भारतीय जनता पार्टीचे अचलपूर मतदार संघाचे आमदार प्रवीण तायडे यांच्या जनसंपर्क कार्यलयात कार्यरत संगणक चालक प्रज्वल डवरे या युवकाच्या डोक्यावर भाजपच्यास माजी पदधिकाऱ्यांनी स्टील च्या रॉडने हल्ला करत गंभीर दुखापत केल्याची घटना रात्रीच्या अंधारात घडली. जखमी युवक प्रज्वल डवरे चांदूर बाजार शहारातून कार्यलय बंद करून त्याच्या गावी जात असतांना आरोपी भाजपा माजी मंडळ अध्यक्ष मुरली माकोडे व माजी नगरसेवक विशाल तायवाडे प्रज्वलला भेटले व जखमी युवकाला म्हणाले की तुझे जे बयाण आहे ते आमचे मताने दे आरोपी विरुध्द कोटीत बोलू नको जखमी प्रज्वलने म्हटले की मी माझे मताने बयान देतो असे म्हटल्यावर आरोपी मुरली व विशाल ने षिविगाळ केली व आरोपी मुरली माकोडे याने कुषीत भुक्या मारल्या व आरोपी विशाल तायवाडे याने त्याचे जवळ असलेले स्टिल चे घातक चायना रॉड ने प्रज्वलच्या डाव्या बाजूला डोक्याला गंभीर दुखापत करून जखमी केले त्यामुळे प्रज्वल च्या डोक्यातून रक्त निघाले व यानंतर तु बयान दिले तर तुला जिवाने मारुन टाकणार अशी धमकी देऊन आरोपी फरार झाले जखमी प्रज्वल याला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच बेशुद्ध पडल्याची माहिती स्थानिकांना मिळाली त्यानंतर त्याला चांदूर बाजार उपजिल्हा रुंगणालय येथे दाखल करण्यात आले वैधकीय अधिकाऱ्यांनी रक्तस्त्राव वाढल्याने प्रज्वल च्या डोक्याला ७ टाके लावले त्यानंतर त्याला अमरावती जिल्हा सामान्य रुंगणालाय येथे हलविण्यात आले आरोपी माजी मंडळ अध्यक्ष मुरली माकोडे व आरोपी विशाल तायवाडे याच्यावर कलम 118 (1),351 (2),(3), 352,3(5) बी एन एस (कलम 324,506, 504,34 भादवी) प्रमाणे गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी
