धुळे, 18 ऑक्टोबर, मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल असलेला आरोपी दहशत माजविण्याच्या उद्देशाने पिस्तुल बाळगून असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनात एलसीबी पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. सुनिल रमेश जाधव रा. पिंपळदेवी नगर मोहाडी उपनगर धुळे असे या आरोपी नाव आहे. त्याच्याकडून गावठी कटट्यासह जिवंत काडतूस असा एकूण ४२ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हां दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
