मुंबई, १२ नोव्हेंबर, (हिं. स) भारतात रूम एअर कंडिशनर्स बाजारपेठेतील निर्विवाद लीडर आणि टाटा समूहातील एक सदस्य, व्होल्टास लिमिटेडने यंदाच्या दिवाळीत संपूर्ण देशभर सणांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी प्रस्तुत केली आहे ग्रँड महोत्सव दिवाळी ऑफर, यामध्ये निवडक व्होल्टास आणि व्होल्टास बेको उत्पादनांवर आकर्षक डील्स दिल्या जात आहेत. नावीन्य, गुणवत्ता आणि ग्राहकांचे समाधान यासाठी नावाजला जाणारा विश्वसनीय ब्रँड म्हणून व्होल्टासने होम अपग्रेडेशन आणि सणासुदीच्य काळातील गिफ्टिंगला सहजसोपे बनवण्यासाठी या विशेष दिवाळी ऑफर्सची घोषणा केली आहे. भारतभर सर्व अधिकृत डीलर्सकडे ३० नोव्हेंबरपर्यंत या ऑफर्सचा लाभ घेता येईल.
सध्याच्या सणासुदीच्या काळात प्रत्येकजण आपल्या घरात प्रियजनांचे स्वागत करण्यासाठी उत्सुक आहे. व्होल्टासच्या ग्रँड महोत्सव दिवाळी ऑफरचा लाभ घेऊन एअर कंडिशनर्स, रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्स आणि वॉटर प्युरिफायर्सच्या विशाल श्रेणीवर १५% पर्यंत इन्स्टंट कॅशबॅक मिळवता येईल. आपल्या घरांमध्ये श्रेणीतील सर्वोत्तम अप्लायन्सेस आणून अपग्रेड करण्यासाठी व्होल्टास देत आहे आकर्षक झीरो डाऊन पेमेंट पर्याय. दर महिन्याला १८८८ रुपयांच्या फिक्स्ड ईएमआयसोबत ग्राहक मिळवू शकतात व्होल्टास उत्पादनांची लक्झरी आणि सुविधा, त्यासाठी त्यांना त्यांच्या फेस्टिव्ह बजेटमध्ये जराही तडजोड करावी लागणार नाही. अजून जास्त लवचिक पेमेंट पर्याय हवे असणाऱ्या ग्राहकांसाठी व्होल्टासने १८ महिन्यांपर्यंतचे दीर्घकालीन ईएमआय देखील सुरु केले आहेत. त्यामुळे ग्राहकांना त्यांची पेमेंट्स दीर्घ कालावधीमध्ये खेचण्याच्या सुविधेबरोबरीनेच व्होल्टास अप्लायन्सेसचा आनंद देखील मिळवता येईल.
ग्राहकांना प्रदान केल्या जाणाऱ्या अनुभवात वाढ करण्यासाठी निवडक उत्पादनांवर एक्स्चेंजवर व्होल्टास देत आहे ५ वर्षांपर्यंतची एक्स्टेंडेड वॉरंटी. आता ग्राहक त्यांच्या व्होल्टास अप्लायन्सेसच्या टिकाऊपणावर आणि विश्वसनीयतेवर पुढील अनेक वर्षे अवलंबून राहू शकतात, त्यामुळे त्यांना मिळेल मनःशांती आणि विश्वास. तसेच ग्रँड महोत्सव दिवाळी ऑफरमध्ये इन्व्हर्टर कॉम्प्रेसरवर लाइफटाइम वॉरंटी देखील दिली जात आहे. त्यामुळे ग्राहकांना सर्वोत्तम गुणवत्ता व कामगिरीचे लाभ मिळतील.
व्होल्टास लिमिटेडचे एमडी आणि सीईओ श्री. प्रदीप बक्षी यांनी सांगितले, कूलिंग उत्पादने आणि होम अप्लायन्सेस उद्योगक्षेत्रातील आघाडीच्या ब्रँड्सपैकी एक या नात्याने, ग्राहकांच्या जीवन गुणवत्तेमध्ये लक्षणीय सुधारणा घडवून आणणे हे आम्ही आमचे उद्दिष्ट मानतो, त्यासाठी आम्ही नाविन्यपूर्ण उत्पादने सादर करतो, ज्यामुळे त्यांना दैनंदिन कामांमध्ये आराम आणि सुविधा मिळते. आमची इच्छा आहे की, सध्याच्या सणासुदीच्या काळात घरातील सर्व कामे सहजपणे व्हावीत आणि सण खूप उत्साहाने साजरे केले जावेत. आमच्या ग्राहकांच्या सणांशी संबंधित सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही सादर करत आहोत उत्पादनांची नाविन्यपूर्ण श्रेणी आणि त्यासोबत सर्वात आकर्षक ऑफर्स देखील.
भारतीय सण नवी सुरुवात आणि समृद्धी दर्शवतात. ग्राहकांची आवडनिवड आणि गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या आणि आमच्या चॅनेल पार्टनर्समार्फत उपलब्ध करवून देणाऱ्या ऑफर्ससह सणांचा उत्साह वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
ग्रँड महोत्सव दिवाळी ऑफर देशभरातील सर्व अधिकृत व्होल्टास चॅनेल पार्टनर्सकडे उपलब्ध आहे. त्वरा करा, जवळच्या स्टोरमध्ये जाऊन या आकर्षक ऑफर्सचा लाभ मिळवा.
हिंदुस्थान समाचार
