
मुंबई, 22 सप्टेंबर (हिं.स.)। पेप्सिको इंडियाचा लोकप्रिय देशी स्नॅक ब्रँड कुर्कुरे आपल्या २५ वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा उत्सव साजरा करत आहे. या विशेष टप्प्यावर कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी एक नवीन इनोव्हेशन सादर केले आहे – कुर्कुरे ज्वार पफ्स. वाढत्या मिलेट-आधारित स्नॅकिंग ट्रेंडला अनुसरून आणलेले हे उत्पादन पारंपरिक ज्वारी आणि कुर्कुरेच्या खास चटपटीत चवीचा संगम आहे. विशेष म्हणजे हे पफ्स तळलेले नसून भाजलेले आहेत आणि त्यामुळे ते ग्राहकांना पारंपरिक घटकांचा आधुनिक, हलका आणि मजेदार अनुभव देतात.
भारतीय खाद्यसंस्कृतीत आज स्थानिक व पारंपरिक घटकांना पुन्हा महत्त्व मिळत आहे. ग्राहक आता सजग होत असून पौष्टिक पर्यायांना पसंती देत आहेत. अशा वेळी पेप्सिको इंडियाने देशाच्या कृषी वारशातील ज्वारीला स्नॅकिंगमध्ये आणून एक वेगळा प्रयोग केला आहे. गेल्या २५ वर्षांत कुर्कुरे हे भारतात विकसित झालेले आणि ग्राहकांशी घट्ट नातं जोडलेले उत्पादन म्हणून ओळखले जाते. या वारशावर आधारित नवीन कुर्कुरे ज्वार पफ्स हे भारतीय परंपरा आणि आधुनिक चवींचा मिलाफ म्हणून बाजारात उतरले आहेत.
पेप्सिको इंडियातील कुर्कुरे आणि डोरीटोजच्या मार्केटिंग डायरेक्टर आस्था भसीन यांनी या लॉन्चविषयी सांगितले, “ग्राहक-केंद्रितता हेच आमचे ध्येय आहे. आम्ही सतत नव्या चव आणि फॉरमॅट्समधून इनोव्हेशन करत आहोत आणि त्याचवेळी भारताच्या समृद्ध पाककृती वारशाशी नातं जपतो. कुर्कुरे ज्वार पफ्स हे त्याचेच उत्तम उदाहरण आहे. पारंपरिक ज्वारीला आम्ही एक मजेदार व सहज उपलब्ध स्नॅकिंग पर्यायात रूपांतरित केले आहे – इस्से अच्छा क्या होगा!”
सखोल संशोधन आणि विकास आणि ग्राहकांच्या पसंतीवर आधारित हे उत्पादन कुर्कुरेला भारताच्या स्नॅकिंग श्रेणीत अग्रगण्य ब्रँड म्हणून अधोरेखित करते. मिलेट्ससारख्या उदयोन्मुख श्रेणीत पाऊल टाकत, कुर्कुरे ने आपला विस्तार अधिक बळकट केला आहे.
नवीन कुर्कुरे ज्वार पफ्स हे १० रुपये आणि २० रुपयांच्या पॅकमध्ये उपलब्ध असतील. सुरुवातीला उत्तर, पश्चिम आणि पूर्व भारतातील बाजारपेठांमध्ये हे उत्पादन आधुनिक व पारंपरिक किरकोळ विक्री केंद्रांवर, प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर आणि क्विक-कॉमर्स अॅप्सवर विक्रीस येईल. या लॉन्चसाठी टीव्ही, डिजिटल आणि रिटेल टचपॉइंट्सवर आधारित मजबूत मीडिया कॅम्पेन राबवले जाणार आहे.
कुर्कुरे हे पूर्णपणे भारतात तयार झालेले आणि देशभरात लोकप्रिय झालेले उत्पादन आहे. पेप्सिको इंडियाच्या पोर्टफोलिओतील आठ प्रमुख ब्रँड्सपैकी कुर्कुरे एक असून, प्रत्येक ब्रँड दरवर्षी अंदाजे १००० कोटींची विक्री करतो. सध्या कुर्कुरे भारताबरोबरच यूएई, कॅनडा, पाकिस्तान आणि बांगलादेशमध्येही तयार व विकले जाते.
—————
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule
